protest of tribal Pardhi community nanded sakal
नांदेड

आदिवासी पारधी समाजाचे आंदोलन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे आदिवासी पारधी समाजाला काेणत्याही सुविधा नाहीत

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे आदिवासी पारधी समाजाला अजूनही रेशनकार्ड नाही, जातीचा दाखला नाही, मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड नाही की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यांच्या सुविधा नाहीत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारचे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता. १४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी पारधी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील पिंपरी महिपाल (ता. नांदेड) येथील पारधी समाजावर गेल्या पाच वर्षापासून सामाजिक बहिष्कार टाकून गावगुंड छळ करत आहेत. त्यामुळे आदिवासी पारधी समाजाच्या दहा कुटुंबांचे जिल्ह्याच्या ठिकाणी पुर्नवसन करावे, आदिवासी पारधी समाजाला व्यावसायासाठी विना अट पाच लाख रुपये अनुदान द्यावे, घरकुल योजना विनाअट द्यावी या व इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अध्यक्षा शीलाताई शिंदे यांच्यासह पदाधिकारी, सदस्य तसेच महिला सहभागी झाल्या होत्या. आंदोलनानंतर शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय आदी ठिकाणी देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात 5 दिवसांत मोठी घसरण! उच्चांकापासून तब्बल 33 हजारांनी स्वस्त; दसऱ्याआधी पाहा ताजा भाव

Distance Education: राज्यात दूरस्थ शिक्षण घेणारे वाढले ;केंद्रीय उच्चशिक्षण विभागाचा अहवाल

Train Viral Video : वा रे पठ्ठ्या ! थेट ट्रेनच्या एसी डब्यातच थाटले पानाचे दुकान, अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Marathi News Live Updates: तिरंगा फडकवण्याच्या आवाहनानंतर दिल्लीतील टॉलस्टॉय मार्ग परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT