nanded sakal
नांदेड

Nanded News : केवळ २७ टक्के लाभार्थ्यांचीच नोंदणी

जिल्ह्यात २३ लाख पात्र; आयुष्मान कार्डासाठी गावपातळीवर नियोजन

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात एकत्रित आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यासाठी सुमारे २३ लाख पात्र लाभार्थी आहेत. आरोग्य विभागाकडून सर्वांची नोंदणी या योजनेच्या लाभार्थ्यांनी करावी यासाठी गावपातळीवर नियोजन केले आहे. तथापी सद्यस्थितीत २२ लाख ८९ हजार ४४१ लाभार्थ्यांपैकी केवळ २७ टक्के लाभार्थ्यांनीच आयुष्यमान कार्डासाठी नोंदणी केल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास आले आहे.

या योजनेंतर्गत सुमारे एक हजार तीनशेपेक्षा अधिक विविध प्रकारच्या व्याधी आजारांवर उपचार व वेळप्रसंगी शस्त्रक्रिया या मोफत पुरविल्या जातात. शासकीय रुग्णालयांसह शासनाने यासाठी काही खासगी रुग्णालयांतही या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला कोणत्याही आजारावर तत्काळ विनाशुल्क उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी केंद्र व राज्य सरकारने एकत्रीत ही योजना उपलब्ध करून दिली आहे.

ग्रामीण भागात अनेक कुटुंबांना उपचाराचा खर्च परवडत नसल्यामुळे ते कर्जाच्या विळख्यात सापडतात. बऱ्याचवेळा उपचारासाठी टाळाटाळ केल्याने दुरूस्त होणारे आजार बळावून दुर्धर आजारात त्याचे रूपांतर होते. हे टाळण्यासाठी सर्व केशरी, पिवळे, पांढरे रेशनकार्डधारक कुटूंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. याचबरोबर प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका, अंत्योदय योजनेचे लाभधारक यांनाही ही योजना लागू आहे.

आरोग्यासाठी बाहेर होणारा खर्च टाळण्यासाठी तसेच विशेषत: न टाळता येणाऱ्या आजारांवर तत्काळ नि:शुल्क उपचारासाठी आयुष्यमान कार्ड अत्यंत गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वाधिक प्राधान्य या बाबीसाठी देऊन ऑनलाईन पद्धतीने तत्काळ नोंदणी करावी. ऑनलाईन अर्जासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीतील केंद्रचालक, सीएससी सेंटर, आशाताई, आरोग्य मित्र तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, नागरी केंद्र आदी सर्व शासकीय रुग्णालयात मार्गदर्शन उपलब्ध आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ही मोबाईलमध्ये आयुष्मान ॲप डाऊनलोड करून त्यात नावाची नोंदणी करता येईल.

— मीनल करनवाल,

मुख्य कार्यकारी अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; तिमाही निकालांमुळे ‘या’ शेअरवर सर्वांची नजर

Maharashtra U-17 Girls Cricket: ईश्वरी अवसरेचा धडाका! १२४ धावांची वादळी खेळी, महाराष्ट्राचा गुजरातवर दमदार विजय

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत भीषण अपघात; पिकअप-दुचाकी धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू

'दुचाकीवर स्वामी अन्...' देऊळ बंद २ चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज, स्नेहल तरडेच्या डोळ्यात अश्रू, काय असेल कथा?

इथली जागा मुडदे गाडणारी, बेचैन आत्म्यांमुळे ग्रहण; चांगल्या जागेवर इमारत बांधा, शिंदेंच्या मंत्र्याचा महापालिकेला सल्ला

SCROLL FOR NEXT