file photo 
नांदेड

नांदेडात उभारणार साडेआठ कोटींचे ईबीसी वसतीगृह; अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

अभय कुळकजाईकर

नांदेड - मागील अनेक वर्षांपासून भाड्याच्या जागेत आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांसाठीचे वसतीगृह सुरु होते. या वसतीगृहाची सरकारी वास्तू निर्माण व्हावी, अशी बऱ्याच दिवसांपासून मागणी होती. यासाठीचा पाठपुरावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला असून त्यांच्या प्रयत्नातून आता नांदेड शहराच्या मध्यभागी सुमारे साडेआठ कोटींचे वसतीगृह उभारण्यात येणार आहे. या वसतीगृहासाठीची प्रशासकीय मान्यता शासनाने नुकतीच दिली आहे.

नांदेड येथे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. परंतु या वसतीगृहाला स्वतःची इमारत नव्हती. त्यामुळे भाड्याच्या जागेत हे वसतीगृह सुरु होते. स्वतःची इमारत नसल्यामुळे भाडे करार संपल्यानंतर वसतीगृहाची इमारत बदलण्याची वेळ येत होती. या संदर्भात नांदेड येथे वसतीगृह उभारण्यात यावे, अशी मागणी पुढे आली होती.

प्रशासकीय मान्यता प्रदान
या सर्व बाबींचा विचार करुन आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहासाठी पुरेशा प्रमाणात निवासची सोय असलेले व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणारे वसतीगृह उभारण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्यास यश आले असून शासनाने नव्यानेच निर्गमित केलेल्या आदेशानुसार नांदेड येथील वसतीगृहाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

आठ कोटी ५३ लाख रुपये खर्च होणार
या वसतीगृहावर आठ कोटी ५३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. २०१९ - २०२० च्या सुधारित दरसूचीनुसार बांधकामाच्या अंदाजपत्रकास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या औरंगाबाद येथील मुख्य अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे. या तांत्रिक मान्यतेनंतर शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या इमारतीमध्ये विद्युतीकरण, स्वच्छतागृह यासह दिव्यांगांसाठी आवश्यक असलेली तरतूद करण्यात आली आहे. वसतीगृहाला मिळालेल्या प्रशासकीय मान्यतेमुळे आता भाड्याच्या जागेत सुरु असलेले हे शासकीय वसतीगृह लवकरच स्वतःच्या इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहे. पालकमंत्री चव्हाण यांचे याबद्दल विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT