nanded sakal
नांदेड

Nanded Crime : सावरखेड ,नांदेड येथील अकरावर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार व खून ; नराधमास फाशीची शिक्षा

अत्याचार करून मुलाचा खून केल्याचे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

बिलोली : सावरखेड (ता. नायगाव, जि. नांदेड) येथील अकरावर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्याचा खून केल्याप्रकरणी आरोपी गिरीष गंगाराम कोटेवाड (रा. मराठा गल्ली, मुदखेड, जि. नांदेड) यास न्यायालयाने पोक्सो कायद्यांतर्गत फाशीची शिक्षा ठोठावली. बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी बुधवारी हा निकाल दिला.

सावरखेड येथील संबंधित मुलगा व त्याचे वडील पाच सप्टेंबर २०१७ ला सायंकाळी पाचच्या सुमारास गावातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक जिल्हा परिषद शाळेपासून तळ्याकडे जात असताना वडील व मुलगा दोघेही घरी परतले. त्यानंतर मुलगा अंगणात खेळत होता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वडिलांची नजर चुकवून तो खेळण्यासाठी बाहेर गेला व बराच वेळ घरी परतला नाही.

आई-वडील, काका आदींसह ग्रामस्थांनी त्याचा बराचवेळ शोध घेतला. रात्री साडेअकराच्या सुमारास गावातील मारुती मंदिराच्या पाठीमागील भागात एका इमारतीच्या तळमजल्यावरील खोलीत मुलाचा मृतदेह दिसला. त्याच्या शरीरावर काचेच्या फुटक्या बॉटलने मारहाण केल्याच्या खुणा होत्या. मुलाचा चेहरा व शर्ट रक्ताने माखलेला होता. त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचेही आढळले होते.

या प्रकरणी संबंधित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून कुंटूर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. गिरीष गंगाराम कोटेवाड याला अटक झाली होती. पोलिसांनी तपास पूर्ण होऊन बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हा विशेष खटला बाल संरक्षण कायद्यानुसार चालविण्यात आला.

सरकार पक्षातर्फे एकूण बारा साक्षी तपासण्यात आले. त्यानंतर न्यायाधीशांनी ३०२ कलमांन्वये कोटेवाडला फाशीची शिक्षा, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याचा सश्रम कारावास त्याचबरोबर कलम ३७७ अंतर्गत दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याचा सश्रम कारावास, पोक्सो कायद्याअंतर्गत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता संदीप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. सहायक पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून पंडितराव इजुलकंटे कासराळीकर यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT