नांदेड

Nanded News: शिंदे गटाच्या खासदाराने नांदेडमध्ये शासकीय रूग्णालयाच्या डीनला साफ करायला लावलं स्वच्छतागृह, Video Viral

नांदेडमध्ये रूग्णालयाच्या डीनला स्वच्छतागृह साफ करायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

नांदेडमध्ये रूग्णालयाच्या डीनला स्वच्छतागृह साफ करायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेडमधील शासकीय रूग्णालायातील हा धक्कादायक प्रकार आहे. हेमंत पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहे, त्यांनी रूग्णालयाच्या प्रमुखांना(डीन) स्वच्छतागृह साफ करायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपुर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

नांदेडमधील जिल्हा शासकीय रूग्णालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. तर कालपासून नांदेडमध्ये शासकीय रूग्णालयात मृत्यू झाल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयाचे डीन एस.आर.वाकोडे यांना हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयातील स्वच्छतागृह साफ करायला लावली आहेत,आज(मंगळवारी) खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचा पाहणी दौरा केला. त्यामध्ये त्यांना रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे निदर्शनास आले. पाहणी करताना त्यांच्या सोबत रुग्णालयाचे डीन (अधिष्ठाता) हे देखील होते. त्यांना स्वच्छतागृह साफ करायला लावल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर खासदार हेमंत पाटील यांच्यावर त्यांच्या या कृत्याबाबत टीका करण्यात येत आहे. (Marathi Tajya Batmya)

या घटनेबाबत बोलताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, 'मी डीनचं समर्थन करत नाही. रूग्णालयाच्या डीनला असं वागवण्यापेक्षा शासनाकडून सफाईबाबत जे काही निर्णय घेणे अपेक्षित आहे. डीन काय करणार त्यामध्ये, शेवटी ते शासकीय रूग्णालय आहे. कामासाठी लोक कमी पडत असतील, जी मनुष्यबळाची करतरता आहे. त्यामध्ये डीन एकटे काय करतील. त्यासंदर्भात प्रशासन, सरकार यांनी लवकरात लवकर निर्णय घेतले पाहिजेत. डीनकडून सफाई करून किंवा त्यांच्याकडून काम करून घेण्याने काय होणार आहे, ही कृती उचित नाही असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.'(Latest Maharashtra News)

तर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, मी डीन यांच्या कार्यालयात गेलो, त्यांच्या केबिनमध्ये जे स्वच्छतागृह आहे त्यापैकी एक बंद होते. तर एकामध्ये सामान भरून ठेवण्यात आले होते. बेसिन तुटले आहे. पाणी नाही, असं पाटील म्हणाले.

बालकांचा वार्ड आहे, त्याठिकाणचे सर्व स्वच्छता गृह गेल्या तीन महिन्यापासून बंद आहेत. पाणी नाही, स्वच्छता नाही, कोणतीही सोय नाही. प्रशासनाने जबाबदारीने ही कामे करायला हवी असंही हेमंत पाटील म्हणालेत.

सामान्याने कुठे जावं, ते प्रमुख आहेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, गर्भवती वार्डमध्ये दारूच्या बाटल्या पडल्या आहेत, डीन यांनी रूग्णालयात फिरलं पाहिजे, परिस्थिती पाहिली पाहिजे असंही पाटील म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT