निवडणूक sakal
नांदेड

नांदेड : सहकारी संस्थांची लवकरच निवडणूक

जिल्ह्यातील ७५० पात्रपैकी १२९ संस्थांची प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. या सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे काम जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून हाती घेतले आहे. जिल्ह्यातील पात्र ७४५ सेवा सहकारी संस्थापैकी १२९ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

जिल्ह्यात इतर निवडणुका प्रमाणेच विविध सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकांनाही महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थांवर संचालक असलेल्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मतदानाचा अधिकार असतो. यामुळे या निवडणुकांकडे स्थानिक पुढाऱ्यांच्या हस्तक्षेप असतो.

या संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्ह्यातील ७४५ सेवा सहकारी संस्था निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत. यातील १२९ संस्थांच्या निवडणुकांचे काम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने हाती घेतले आहे. उर्वरित संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी सांगितले.

जिल्ह्यातील २८३ संस्थांवर प्रशासक आहेत. निवडणूक कार्यक्रम झालेल्या ४५ दिवसांमध्ये निवडणुका घेतल्या जातात. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात देगलूर तालुक्यातील १६, अर्धापूर तीन, बिलोली सात, लोहा तीन, हिमायतनगर आठ, भोकर ११, हदगाव पाच, कंधार १८, धर्माबाद दोन, मुदखेड पाच, मुखेड ३० तर नांदेड तालुक्यातील पाच सेवा सहकारी संस्थांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT