file photo 
नांदेड

धर्माबाद नगरपालिकेतील आणखी दोनजण अटक; बनावट कागदपत्रांनी दस्तनोंदणीचे प्रकरण

सुरेश घाळे

धर्माबाद (जिल्हा नांदेड ) : येथील नगरपरीषदेतील काही कर्मचारी व शहरातील दलालांनी संगनमत करुन बनावट कागदपत्रांच्या आधारावर दस्तनोंदणी करुन लाखो रुपयांचे चांगभले करुन घेतले होते. सदरील प्ररकरणातील आणखी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आला आहे. व त्यांना न्यायालयात हजर केले असता, येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. सांळूके यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

धर्माबाद येथील नगरपरीषदेतील काही कर्मचारी व शहरातील दलालांनी संगनमत करुन बनावट कागदपत्रांच्या आधारावर दस्तनोंदणी करुन लाखो रुपयांचे चांगभले करुन घेतले आहेत. सदरील प्ररकरणातील फरार असलेला व बिलोली येथील नगरपरीषदेत कार्यरत असलेला कर्मचारी गुलाम समदानी व दलाल आलमखान अब्दुलाखान यंना सोमवारी (ता. आठ) पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सांळूके यांनी त्या दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

पाणीपुरवठा व विद्युत साहित्य खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार

तसेच सदरील प्ररकरणातील धर्माबाद येथील नगरपरीषदेतील कर्मचारी नागेश अपलोड हा फरार असून त्यास पकडण्यासाठी पोलिस शोध घेत आहे. परंतु सदरील बनावट कागदपत्रांच्या प्रकरणामुळे धर्माबाद नगरपरीषदेची नाचकी झाली आहे. व शहरातील मालमत्ताधारकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नगरपरीषदेत अनेक नियमबाह्य पद्धतीने कामे करण्यात आले आहे. पाणीपुरवठा व विद्युत साहित्य खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार पालिकेतील विरोधी गटातील नगरसेवकांनी येथील तात्कालीन मुख्याधिकारी यांना दिले आहे. परंतु अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे नगरपरीषदेत झालेल्या अनेक गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी शहरातील जनतेतून होत आहे.
 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT