nanded sakal
नांदेड

Ayodhya Ram Mandir : अवघे नांदेड झाले राममय ; शोभायात्रा बाजारपेठ राममूर्ती, झेंडे, आकाशदिव्यांनी सजली

अयोध्येतील श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नांदेड शहर आणि परिसरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अवघे नांदेड राममय झाले असून हा सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा होत आहे

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : अयोध्येतील श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नांदेड शहर आणि परिसरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अवघे नांदेड राममय झाले असून हा सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा होत आहे. त्याचबरोबर सजावटीसाठी देखील विविध वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. विविध प्रकारच्या राम मुर्ती, झेंडे, आकाशदिव्यांनी बाजारपेठ सजली आहे.

श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा दिवाळीसारखा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आल्यामुळे अनेकांनी मंदिराची स्वच्छता साफसफाई केली आहे. तसेच मंदिरांवर तर काहींनी घरावर सजावट तसेच विद्युत रोषणाई केली आहे. बाजारपेठेत देखील राममंदिराच्या प्रतिकृतीसह विविध वस्तू, श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमानाच्या प्रतिमा, झेंडे, तोरण, कापडी झेंडे, मफलर, टोपी, स्टिकर अशा वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. तसेच त्यांना मागणीही वाढली असल्याचे दुकान विक्रेत्यांनी सांगितले. त्याचबरोबर काहींनी अतिषबाजीसाठी आत्तापासूनच फटाक्यांची खरेदी करून ठेवली आहे.

काबरानगरात शोभायात्रा

श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची पावडेवाडी नाका ते काबरानगर अशी शोभायात्रा शनिवारी (ता. २०) सायंकाळी काढण्यात आली होती. या शोभायात्रेत भजनी मंडळ, विद्यार्थ्यांचे लेझिम पथक यांच्यासह महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भावसार चौकात सोमवारी कार्यक्रम

तरोड्यातील मालेगाव रोडवरील भावसार चौकात सोमवारी (ता. २२) कार्यक्रम येथे महाआरतीचे व महाप्रसादाचे रामभक्तांच्या वतीने सायंकाळी साडेसहा वाजता श्रीराम प्रभूंची महाआरती व फटाक्यांची अतिषबाजी तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; तिमाही निकालांमुळे ‘या’ शेअरवर सर्वांची नजर

Maharashtra U-17 Girls Cricket: ईश्वरी अवसरेचा धडाका! १२४ धावांची वादळी खेळी, महाराष्ट्राचा गुजरातवर दमदार विजय

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत भीषण अपघात; पिकअप-दुचाकी धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू

'दुचाकीवर स्वामी अन्...' देऊळ बंद २ चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज, स्नेहल तरडेच्या डोळ्यात अश्रू, काय असेल कथा?

इथली जागा मुडदे गाडणारी, बेचैन आत्म्यांमुळे ग्रहण; चांगल्या जागेवर इमारत बांधा, शिंदेंच्या मंत्र्याचा महापालिकेला सल्ला

SCROLL FOR NEXT