file photo 
नांदेड

पाणी वाचविण्यासाठी युवा पिढींनी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ. विपीन 

प्रल्हाद कांबळे

नांदेड:- पाण्याचा एक-एक थेंब महत्वाचा असून पाणी वाचविणे ही काळाची गरज आहे. पाणी व्यर्थ वाया जाऊ न देता पाण्याचा योग्य वापर करावा. पाणी वाचविण्यासाठी युवा पिढींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

जलसंधारण मंत्रालय आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात 700 जिल्ह्यामध्ये कॅच द रेन ( पावसाचे पाणी साठवा) ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील 100 गावाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील गावाचाही समावेश आहे. या मोहिमेंतर्गत गावातील किमान 100 कुटूंबाना छतावर पडणारे, शेतात पडणारे तसेच गावाच्या परिसरात पडणारे पावसाचे पाणी साठवण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी , चंदा रावळकर  यांनी दिली.

नेहरू युवा केंद्राच्यावतीने युवा कार्यक्रम व सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला जिल्हास्तरीय कॅच द रेन अभियानाचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी कॅच द रेनच्या लोगोचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, वन विभाग, सिंचन विभाग एनजीओ व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Navy Rescue: तेल प्रश्न सुटणार? मध्यपूर्वेच्या युद्धछायेत भारताची मोठी तयारी; टँकर वाचवण्यासाठी युद्धनौका सज्ज, हालचाली वाढल्या

Israel Iran War : मोठा दिलासा ! जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती उतरल्या, डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्ध संपविण्याचे संकेत

Jayant Patil: राज्य कर्जाच्या विळख्यात: आमदार जयंत पाटील यांचा सरकारवर घणाघात, घोषणांचा पाऊस आणि तरतुदींचा दुष्काळ!

Relief From Dangerous Potholes in Beed : सात वर्षांच्या संघर्षानंतर धानोरा रस्त्याला नवा श्वास; दोन टप्पे पूर्ण!

Satara Bribery Case: प्राध्‍यापक पदोन्नतीसाठी खटावमध्ये लाचखोरी; लाखोंच्‍या राेकडसह दाेन लोकसेवक ताब्यात, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT