22 days baby story in belgaum marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

मृत्यूशी झुंज देता देता अखेर ते जिंकले ; 22 दिवसीय बालकाला मिळाले जीवदान

तानाजी बिरनाळे

मांगूर (बेळगाव) : मूळचे एकसंबा येथील रहिवासी व पट्टणकडोली येथे स्थायिक असलेल्या अझरुद्दीन तांबोळी (चौधरी) व आयेशा तांबोळी या  दापंत्याच्या पोटी जन्मलेल्या 22 दिवसाच्या बालकावर अत्यंत किचकट व महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया करून मूळचे कारदगा येथील व सध्या निपाणी येथे स्थायिक असलेले डॉ. शीतल धरणगुत्ते यांनी जीवदान दिले.


कोरोनासारख्या गंभीर काळात हे यश आल्याने तांबोळी कुटुंबीयांच्या जीवनात आनंदाचा फुलोरा बहरला आहे.
त्यामुळे डॉ. धरणगुते यांचे कौतुक होत आहे.तांबोळी दांपत्याला कोल्हापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये अपत्य प्राप्ती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बालकास श्वासोच्छासाचा त्रास उद्भभवून लॅटिंगो मलेरिया हा आजार झाला होता. बरेच दिवस त्या खासगी हॉस्पिटलमध्ये ठेवून सुद्धा आजाराचे निदान लागत नव्हते.

दोन-तीन इतर हॉस्पिटलमध्ये सुद्धा काही दिवस मुलाला ठेवले. पण काही उपचार न झाल्याने शेवटी कुटुंबीयांनी कारदगा येथील डॉ. अभिनंदन मुराबट्टे यांच्या सल्ल्याने  डॉ. शीतल धरणगुत्ते यांची भेट घेतली. बाळाच्या आजारची लक्षणे सांगितल्यानंतर त्यांनी  नेमके निदान केले. तात्काळ कोल्हापूर येथील हॉस्पिटलमध्ये आपल्या सहकारी डॉक्टरांच्या टीममार्फत यशस्वी शस्त्रक्रिया करून मृत्यूशी झुंज देणाऱ्या 22 दिवसीय बालकास जीवदान दिले.डॉ. धरणगुत्ते यांना या शस्त्रक्रियेमध्ये डॉ. अमित गिरवाल , डॉ. खलील मुल्ला, डॉ. जगदीश सर्वज्ञ, डाॅ. साईनाथ पवार  यांचे सहकार्य मिळाले.

हेही वाचा- केएमटी चे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक आरटीओ निरीक्षक सुभाष देसाई यांचे निधन.... -
कारदगा ग्रामस्थांनी निपाणी येथील  हॉस्पिटलमध्ये डॉ. धरणगुत्ते यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी ग्राम पंचायत सदस्य राजू खिचडे, माजी उपाध्यक्ष भरत भागाजे, माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल पटेल, उस्मान मकानदार, तबरेझ अत्तार, बंदीनमाज जमादार उपस्थित होते.

पैशापेक्षा दिले माणुसकीला महत्त्व 

आजकाल वैद्यकीय क्षेत्राला अर्थकारणाचे वलय निर्माण झाले आहे. एखादा पेशंट खासगी दवाखान्यात गेला की डिस्चार्ज मिळेपर्यंत पेशंटची व नातेवाईकांची अवस्था नेमकी काय होते, हे प्रत्येकांना माहित आहे. पण अशा या काळात 
सुद्धा पैशापेक्षा माणुसकीला महत्त्व देणारा माणसातला देव माणूस म्हणून डॉ. धरणगुत्ते यांनी कोरोनासारख्या महामारीच्या काळात अत्यल्प खर्चात किचकट शस्त्रक्रिया करून सर्वसामान्य कुटुंबाला आधार देण्याचे काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT