28 goats killed in Tarsa attack in Bahadurwadi in Valva taluka 
पश्चिम महाराष्ट्र

वाळवा तालुक्‍यातील बहादूरवाडीत तरसांच्या हल्ल्यात 28 शेळ्या ठार

अमोल पवार

बागणी ः बहादूरवाडी (ता. वाळवा, जि. सांगली ) येथे गुरुवारी सायंकाळी सागर पाटील यांच्या शेतात बांधलेल्या शेळ्यांवर तरसाच्या कळपाने हल्ला केला. यात 28 शेळ्या ठार झाल्या, तर 2 गंभीर जखमी आहेत. त्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, सागर पाटील यांच्या शेतात गेल्या आठ दिवसांपासून मेंढपाळ सागर माने, सुरेश, बाद्रे, अभिजात माने, रामचंद्र गोरडे यांनी 600 हून अधिक शेळ्या बसवल्या आहेत. शेळ्यांच्या वयोमानानुसार वेगवेगळे तार कंपाउंड तयार करून त्यांना सुरक्षा दिली आहे.

नेहमीप्रमाणे सागर, सुरेश, अभिजित, रामचंद्र यांनी त्यातील काही शेळ्या चरण्यासाठी बाहेर नेल्या होत्या. गुरुवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास अचानक तरसाच्या कळपाने हल्ला केला. त्यात सर्वसाधारण एक ते अडीच माहिने वयाच्या 28 शेळ्या ठार, तर दोन गंभीर जखमी केल्या होत्या. हल्ला झालेल्या शेळ्यांचा आवाज ऐकून शेतमालक सागर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली, तोच तरसाचा कळप उसामध्ये पळून गेला. 

या घटनेची सागर यांनी मेंढपाळांना माहिती दिली. परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. ही माहिती इस्लामपूर वनविभागाला कळवली. तत्काळ शिराळचे वनक्षेत्रपाल एस. आर. काळे, वनपाल अमोल शिंदे, वनरक्षक अमोल साठे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. 

हल्ल्याची ओळख 
प्रथमदर्शनी हल्याच्या ठिकाणी पोहचलेल्या सागर पाटील यांना दिसलेला प्राणी हा नेमका कोणता आहे समजला नाही. वनक्षेत्रपाल अधिकाऱ्यांनी संग्रहित चित्राद्वारे तरस प्राणी असल्याची खात्री पटवून घेतली. या घटनेने मेंढपाळ सागर माने, सुरेश बाद्रे, अभिजित माने, रामचंद्र गोरडे यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

75 टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्यात

हल्ल्यात मरण पावलेल्या व जखमी झालेल्या शेळ्यांचा पंचनामा करून त्याच्या वयोमानानुसार बाजारभावाच्या किमतीच्या 75 टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे. 
- अमोल साठे, वनरक्षक, इस्लामपूर 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Election : नेपाळमध्ये सत्तापालट ! ३५ वर्षांच्या रॅपरने केला ४ वेळा पंतप्रधान राहिलेल्या के.पी. ओलींचा पराभव, बालेंद्र शाह इतिहास रचणार

Latest Marathi News Live Update : अंबरनाथमधील प्राचीन शिव मंदिर परिसरावर पालिकेची कडक कारवाई

Pune Accident: पुण्यात अपघातांची मालिका वेगवेगळ्या अपघातांत महिलेसह तीन जणांचा मृत्यू

UPSC Result: ट्रक ड्रायव्हरच्या लेकीची उत्तुंग भरारी! उत्तराखंडच्या फातिमाने यूपीएससीत मिळवली ७०८ वी रँक

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील महत्त्वाचा आरोपी जेलबाहेर येणार; कोर्टाकडून विशेष परवानगी, नेमकं कारण काय ?

SCROLL FOR NEXT