पश्चिम महाराष्ट्र

'आरबीआय'विरुद्ध राज्यातील 499 नागरी बॅंका... का ते वाचा? 

तात्या लांडगे

सोलापूर : पंजाब महाराष्ट्र बॅंकेच्या घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने ठेवीदारांच्या स्वरक्षणाचे कारण पुढे करत नागरी बॅंकांवर निर्बंध घातले आहेत. बॅंकांकडील स्वनिधी व न गुंतवलेल्या राखीव निधीच्या (फ्री-रिझर्व्ह फंड) 10 टक्‍केच कर्जवाटप करावे, पाच कोटींवरील कर्जवाटप व थकबाकीची अपडेट माहिती द्यावी, प्रत्येक नागरी बॅंकेने बोर्ड ऑफ मॅनेजमेंट नियुक्‍त करावे, अशी बंधने घातली आहेत. या निर्णयाविरुद्ध राज्यातील 499 नागरी बॅंकांनी आरबीआयच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

देशात एक हजार 551 नागरी बॅंका असून या बॅंकांच्या 10 हजार 646 शाखा कार्यरत आहेत. त्यांच्याकडे चार लाख 56 हजार 506 कोटींच्या ठेवी आहेत. तर राज्यात 462 नागरी बॅंका व 37 मल्टिस्टेट बॅंकांमध्ये दोन लाख 84 हजार 509 कोटींच्या ठेवी आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या नव्या निर्णयानुसार नागरी बॅंकांच्या संचालकांना वेळोवेळी सल्ला देण्याकरिता प्रत्येक बॅंकेने बोर्ड ऑफ मॅनेजमेंट नियुक्‍त करणे बंधनकारक केले आहे. त्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट, वकील, बॅंकर्स अशा किमान पाच ते 12 व्यक्‍तींचा समावेश असावा, असे निर्देश दिल्याचे विभागीय उपनिबंधक कटके यांनी सांगितले. मात्र, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर अशा आदिवासी भागातील नागरी बॅंकांसमोर त्याचा पेच निर्माण झाला आहे. तर मुंबई, पुणेसह अन्य नागरी भागांतील नागरी बॅंकांची पंचाईत झाली असून त्यांना आता छोट्या कर्जदारांचा शोध घ्यावा लागणार आहे. 

असे आहेत आरबीआयचे निर्बंध 

  • अग्रक्रम असलेल्या क्षेत्राचे कर्जवाटप 2023 पर्यंत 75 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवावे 
  • पाच कोटींवरील कर्ज देताना त्याची माहिती सर्वप्रथम आरबीआयला कळवावी 
  • प्रत्येक नागरी बॅंकेत संचालक मंडळासमवेत बोर्ड ऑफ मॅनेजमेंट नियुक्‍त करावे 
  • बॅंकेच्या एकूण फ्री रिझर्व्ह फंडाच्या 10 टक्‍केच कर्जवाटप करावे 
  • नागरी बॅंकांना शाखा वाढविता येणार नाहीत; छोट्या कर्जदारांनाच कर्जवाटपात प्राधान्य असावे 

राज्यातील नागरी बॅंकांचा पसारा 

  • एकूण नागरी बॅंका : 499 
  • एकूण ठेवी : 2.85 लाख कोटी 
  • एकूण स्वनिधी : 70 हजार कोटी 
  • दरवर्षीचे कर्जवाटप : 1.70 ते 2 लाख कोटी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20I Squad for England Tour: अक्षर पटेलची उपकर्णधारपदावरून हाकलपट्टी, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूकडे सोपवली जबबादारी

Illegal Liquor: पुण्यातील घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सर्जिकल स्ट्राइक, ३ हजारपेक्षा जास्त गुन्हे दाखल

Asian Games 2026 : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा, सलग दुसरं गोल्ड मेडल मिळवण्याच्या हेतूने उतरणार मैदानात

देशात खळबळ! मोठा पक्ष फुटणार? १६ खासदारांचे फोन बंद, २२ खासदार पक्ष फोडण्यास तयार; मुख्यमंत्री दिल्लीत तळ ठोकून

India T20I Squad for England Tour: सूर्याला डच्चू! अडीच वर्षांपासून बाहेर असलेला खेळाडू झाला कर्णधार; वैभव सूर्यवंशीचीही निवड

SCROLL FOR NEXT