bedana.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सौद्यात 610 टन बेदाण्याची आवक : इतका उच्चांकी दर

सकाळवृत्तसेवा

सांगली-  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी झालेल्या बेदाणा सौद्यात 610 टन आवक होती. तर बेदाण्याला 180 रूपये प्रति किलो इतका भाव मिळाला. 

सांगली मार्केट यार्डात जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत बेदाणा सौदे मागील आठवड्यापासून सुरू करण्यात आले आहेत. बुधवारी आणि शुक्रवारी प्रत्येकी 30 दुकानातील बेदाण्याचे सौदे काढले जात आहेत. आज शुक्रवारी शेखर पुरुषोत्तम ठक्कर यांच्या दुकानात मुकुंद मिरजे (मालगाव) यांच्या 45 बॉक्‍स बेदाण्याला 180 रुपये प्रति किलो इतका उच्चांकी भाव मिळाला. हा बेदाणा ओम सेल्स कार्पोरेशनचे नितीन मर्दा यांनी खरेदी केला. 

सध्या देशात "कोरोना' चा प्रादुर्भाव वाढत असूनही अनेक मोठ्या शहरांमध्ये मार्केट सुरू आहेत. लॉकडाउननंतर बेदाणा व्यापार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. देशांतील काही शहरांमधून बेदाण्याची मागणी होत आहे. त्यामुळे सांगलीतील बेदाणा सौद्यामध्ये अनेक व्यापारी माल खरेदीसाठी येत आहेत. शुक्रवारी 61 गाड्यामधून 610 टन मालाची आवक झाली होती. दुपारी बारा ते पाच या वेळेत सौदे काढले जात आहेत. 

सध्या चांगल्या हिरव्या मालास 130 ते 180 तर ऍव्हरेज हिरव्या बेदाण्यास 100 ते 140 रुपये, काळा बेदाण्यास 40 ते 60 रुपये आणि पिवळ्या देण्यास 100 ते 150 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. सांगलीत बेदाणा सौदा उत्तम प्रकारे सुरू आहेत. शेतकऱ्यांनी आपला बेदाणा सौद्यात विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केले आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sant Dnyaneshwar Maharaj palkhi: ज्ञानेश्वर माउली पालखी रथ बैलजोडीवरून वाद; रानवडे कुटुंबीयांना मान, मात्र देवस्थानचे पत्र नाही

मिथुन चक्रवर्ती यांना पहिल्या प्रेमात मिळालेला धोका, म्हणालेले...'ती सोडून गेली नसती तर आज मी...'

Pune Solapur Highway: धाराशिव आगाराची एसटी बस ब्रेक फेल; ४० प्रवासी थोडक्यात बचावले, चालकाने जीव धाेक्यात घातला, अन् काय घडलं!

Latest Marathi News Live Update : रात्री उशिरा घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २९ रुपयांनी वाढ

Maharashtra Monsoon Update : मॉन्सूनची कोकणात दमदार एन्ट्री! राज्यातील 'या' २६ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT