पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यात दोन अपघात

सकाळ वृत्तसेवा


जामगावगाव अपघात चालक ठार
बार्शी ः बार्शी- लातूर रस्त्यावर जामगाव येथील रिलायन्स कंपनीजवळ पिकअप उलटून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर दोन जण जखमी झाले. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बार्शी तालुका पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे. 


चंद्रकांत तुळशीराम गोपे (वय 40, रा. नांदगाव, ता. चाकूर, जि. लातूर), असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. दिनेश रेड्डी, गणेश साळुंखे अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात शुक्रवारी पहाटे सव्वादोन वाजता झाला. महेश बदाले (रा. इंदिरानगर, लातूर) यांनी फिर्याद दिली. लातूर येथून पालघर येथे महिंद्रा पिकअप टेम्पो (एमएच 24, एबी 8506) हॉस्टेलचे कॉट व गाद्या असे भाडे घेऊन जात असताना जामगावजवळ येताच वळणावर उलटला. चालक गोपे यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिस हवालदार शिरसट तपास करीत आहेत. 

करकंबमध्ये एकाचा वाहनाच्या धडकेने मृत्यू 
करकंब ः पंढरपूर-टेंभुर्णी रस्त्यावर करकंब हद्दीतील व्यवहारे पाटीजवळ गुरुवारी सकाळी रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने येथील विठ्ठल एकनाथ धायगुडे (वय 70) यांचा मृत्यू झाला. ते येथील पांडुरंग धायगुडे यांचे वडील होत. 
वाहनाने धडक दिल्यानंतर विठ्ठल धायगुडे यांना तातडीने पंढरपूर येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. पण डोक्‍याला जोरदार मार लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पंढरपूर येथील कॉटेज रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर करकंब येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT