accident 
पश्चिम महाराष्ट्र

नगर-पुणे महामार्गावर अपघातात पाच जण ठार

मार्तंड बुचडे

पारनेर : नगर-पुणे महामार्गावर राळेगणसिद्धी फाटा येथे आज पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झाले. या अपघातामध्ये आणखी तीन प्रवासी गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

लक्झरी बस व ट्रक मध्ये हा अपघात झाला आहे. अपघातानंतर अडकलेली वाहने काढण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे घटनास्थळी क्रेनही पोचू शकत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. अपघातामधील काही जखमींना शिरूर येथील रुग्णालयात तर, काहींना पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

वाहतूक कोंडीमुळे अपघातस्थळापासून नगर व पुणे अशा दोन्ही बाजूला दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. अपघातामधील लक्झरी बस नगरहून पुण्याच्या दिशेने तर ट्रक पुण्यावरून नगरच्या दिशेने धावत होती, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT