accident in sangli miraj road four wheeler and truck in-one person dead in accident 
पश्चिम महाराष्ट्र

डॉक्टरवर काळाने घातला घाला ; डंपर - चारचाकीच्या अपघातात जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

मिरज (सांगली) : येथील म्हैसाळ सुभाषनगर रस्त्यावर डंपरची चारचाकीस धडक बसून झालेल्या अपघातात चारचाकी चालक डॉक्‍टर जागीच ठार झाले. चारचाकीत डॉक्‍टरांच्या शेजारी बसलेले मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. डॉ ओंकार अविनाश वाले (वय ३४,रा. मिरज पंढरपूर रोड) असे अपघातामध्ये ठार झालेल्या डॉक्‍टरांचे तर सनी स्वामी हे मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

रविवारी झालेल्या अपघात म्हैसाळ सुभाषनगर रस्त्यावरील वाहतूक दीड तास  ठप्प राहिली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अपघातामधील खडीने भरलेला डंपर (एम एच १० सी आर २४२८) हा सुभाषनगरकडून म्हैसाळकडे जात होता. तर चारचाकी (एम एच १० सीए २९३९) ही म्हैसाळकडून सुभाषनगरकडे येत होती. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीची म्हैसाळकडे जाणाऱ्या डंपरशी जोरदार धडक झाली. यामध्ये डंपर चालकाच्या बाजूकडील पुढचा टायर फुटला झाला. तर गाडीचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये चार चाकी चालवणारे डॉ. ओंकार अविनाश वाले हे जागीच ठार झाले.

तर मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी सनी स्वामी हे किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर तातडीने सनी स्वामी यांना रुग्णालयात पाठवले. तर डॉ.ओंकार वाले यांचा चारचाकीमध्ये अडकलेला मृतदेह क्रेन आणि जेसीबीने गाडीतून बाहेर काढला. डॉ. वाले हे बेडग  येथील गणपती मंदिरानजीक आपला खासगी दवाखाना चालवत होते. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

TVKच्या नेत्याला पाठलाग करत क्रूरपणे संपवलं, कोयत्याने सपासप वार; मृत्यूनंतरही वार करतच राहिले, घटना CCTVत कैद

महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसणार मनोज बाजपेयी; १० किलो वजन घटवलं, नवा लूक पाहून चाहते शॉक

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Chinchwad Electricity ट्रान्सफर्मरला आग, चिंचवड, वाल्हेकरवाडीसह रावेत परिसरात वीजपुरवठा खंडित; आगीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT