abhijit choudhari.jpg
abhijit choudhari.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

खासगी दवाखाने बंद  ठेवल्यास कारवाई 

सकाळवृत्तसेवा

सांगली-जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय दवाखाने कोणत्याही परिस्थितीत बंद ठेवता येणार नाहीत. सर्व जनरल मेडिकल प्रॅक्‍टीशनर्सनी दवाखाने सुरू करावेत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. 

जिल्हाधिकारी आणि जनरल प्रॅक्‍टिशनर्स यांची काल बैठक झाली आहे. बैठकीत "ओपीडी' सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतरही सांगली-मिरज शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात खासगी रुग्णालय बंद ठेवून डॉक्‍टरांनी अघोषित संप पुकारला आहे. त्यांच्या विरोधात कडक भूमिका घेत आता अनेक ग्रामपंचायती पुढे आल्या असून या डॉक्‍टरांच्या वर्तणूकविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 


कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आणखी 21 दिवसांचा "लॉक डाऊन' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर जाहीर केला आहे. त्यातून अत्यंत महत्त्वाच्या वैद्यकीय सेवेला वगळण्यात आले आहे. सर्व सरकारी खासगी दवाखाने सुरूच राहतील, हे स्पष्ट आहे. अशावेळी जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागाची आरोग्यसेवा ज्यांच्या हाती आहे, त्या खासगी डॉक्‍टरांनी दवाखाने सुरू ठेवणे अपेक्षित होते. या संकट काळात डॉक्‍टरांनी मात्र दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला. सुरक्षा साधने नाहीत, किट नाही, अशी कारणे त्यांच्याकडून सांगितली जात आहेत. त्यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडून पडली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ताण आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी खासगी डॉक्‍टरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. कायद्यानुसार या डॉक्‍टरांनी संकटकाळात त्यांचे दवाखाने सुरू ठेवणे बंधनकारक आहे, असे न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही या नोटीस मधून देण्यात आला आहे. 


त्यात म्हटले आहे की, जिल्ह्यातील लोकांना संकट काळात वैद्यकीय सेवा पुरवण्याची आवश्‍यकता असताना त्यांना आवश्‍यक ती सेवा पुरवणे खासगी रुग्णालयांवर बंधनकारक राहील. सेवा पुरवताना त्यांनी आवश्‍यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. कुणी दवाखाने बंद ठेवले तर त्यांच्यावर आपत्ती निवारण कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT