Add to the beauty of Solapur 
पश्चिम महाराष्ट्र

यामुळे वाढले सोलापूरचे सौंदर्य (Video)

सुस्मिता वडतिले

सोलापूर : सोलापूर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल वाटचाल होत आहे. सध्या जुने पुणे नाक्‍यासमोरील छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्‍वारूढ पुतळ्यासमोर कारंजे बसविल्याने पुतळ्याच्या भोतवतालाच्या परिसराच्या सौंदर्या भर पडली आहे. ते पाहण्यास सायंकाळी तरुणाईची गर्दी होत आहे. त्याचबरोबर आता महाराष्ट्रातील पाचवे प्रमुख मोठे शहर अशी सोलापूरची ओळख आहे. 
हेही वाचा : झेडपी अद्यक्षपदामुळे मोहितेंचे समाधान?
सोलापूरचे वैभव दिवसेंदिवस उज्ज्वल
सोलापुरात स्मार्ट सिटीची अनेक कामे सुरू असून शहर स्मार्ट बनण्याकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे सोलापूरचे वैभव दिवसेंदिवस उज्ज्वल होत आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर यात्रा अवघ्या काही दिवसांवर असून ही गड्डा यात्रा मोठ्या प्रमाणावर भरते. यात्रेत कर्नाटक परिसरातून भाविक येतात. कोणत्याही शहराचा विकास कसा असेल हे त्या शहराच्या प्रवेशापासून समजते. प्रत्येक शहरात प्रवेश करताना नाका असतो. तसा सोलापूर शहरात असून तो म्हणजे जुना पुणे नाका होय. येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असून सुशोभीकरणातून येथे कारंजे करण्यात आले आले. त्यामुळे यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना हा नाका आकर्षित करत आहे. हा परिसरात पाहण्यास येणारे येथे रमून जातात. या भागात रात्री तरुणाई व वृद्धमंडळी गप्पाटप्पा करत बसतात. 

हेही वाचा : जयंत पाटलांनी घेतली सोलापूर झेडपीतील पराभवाची माहिती

प्रत्येक रविवारी आम्ही छत्रपती संभाजी महाराजांची पूजा आणि आरती करतो. शहरातील मुख्य परिसर अशी ओळख आहे. शहरात येणारे प्रत्येकजण हे येथूनच जातात. हा परिसर रम्य असून पुणे, मुंबईप्रमाणे सोलापुरात पाहण्यास खूप काही आहे. असे सोलापूर शहर प्रगतीकडे वाटचाल करत आहे. 
- प्रियांका शिंदे 

नेहमीच असे बोलतात की अंगण पाहिले असता घराची स्वच्छता कळते. तसे सोलापूर शहरात प्रवेश केल्यानंतर समजते की सोलापूरचे अंगण जुना पुणे नाका आहे. येथूनच सोलापुरात आणखी काही पाहण्यासारखे असल्याची उत्सुकता सर्वांनाच होते. 
- सरोजनी क्षीरसागर 

शहरातील मुख्य परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असून तो भव्यदिव्य आहे. सध्या येथे सुधारणा होत असून ते काम पूर्णत्वास येत आहे. शहरात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. 
- राहुल दहीहंडे 

जुना पुणे नाका येथून प्रवेश करताना सोलापूरची ओळख निर्माण होते. येथून प्रवेश करताना सोलापूर स्मार्ट सिटीत आल्यासारखे वाटते पुढे जाऊन सोलापूर शहर पूर्ण ग्रीन सिटी व्हावे. 
- कुणाल कोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: युद्धाचा धक्का! सेन्सेक्स 2300 अंकांनी घसरला, कोणत्या सेक्टरला मोठा फटका?

Israel Iran War Update : इराण-इस्रायल युद्ध थांबणार ? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा खुलासा; नेतन्याहूसोबत घेणार परस्पर निर्णय

Divakar Game Arrest Wardha POCSO Case : 78 वर्षीय नेत्याचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; राष्ट्रवादी पक्ष कारवाई करणार का?

T20 World Cup जिंकला आता रिटायरमेंट घेणार का? सूर्यकुमार यादवने सांगितला पुढचा नेमका प्लॅन काय

Viral Video: 'मला लग्नाला का नाही बोलावलं...' चिमुकलीच्या प्रश्नाला विजयने दिलं क्युट उत्तर,म्हणाला... 'तुझ्यासाठी खास मी...'

SCROLL FOR NEXT