images.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

तब्बल 13 वर्षांनी  "रेशनींग'च्या रांगेत ः कोण ते पहा 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या केशरी शिधापत्रिका धारकांसाठीच्या धान्य वाटपाला शहरी भागात उद्यापासून ( ता. 25) सुरुवात होत आहे. तर ग्रामीण भागात गेल्या चार दिवसापासून सुरवात झालेली आहे. प्रतिमाणसी 3 किलो गहू 8 रुपयांनी तर 2 किलो तांदूळ 12 रुपयांनी मिळणार आहे

या कार्डधारकांना तब्बल 2007 नंतर प्रथम म्हणजे 13 वर्षांनी धान्य होत आहे. शहरी भागातही काही दुकानदारांनीही वाटप सुरु केले आहे. केंद्र सरकाने दिलेल्या मोफत तांदळाचे वाटप 97 टक्केहून अधिक झाल्याची माहिती पुरवठा विभागातून देण्यात आली. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केशरी कार्डधारकांना माणशी पाच किलो धान्य वाटण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे. अशा केसरी कार्ड असलेल्या जिल्ह्यातील 10 लाख 18 हजार 187 लोकसंख्येला प्रतीमाणशी पाच किलोप्रमाणे धान्याचे वाटप केले जाणार आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत वाटण्यात येत आहे. प्रत्येक व्यक्ती 5 किलोप्रमाणे 97 टक्केहून अधिक वाटप पूर्ण झालेले आहे. तत्पूर्वी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून नियमित कार्डधारकांना 98 टक्के धान्याचे वाटप पूर्ण झालेले आहे. 

येथे विलंब शक्‍य... 
सांगली शहरात कोरोना रुग्ण सापडल्याच्या पार्श्‍वभूमीवर विजयनगर आणि गणपतीपेठ परिसरातील चार किलोमीटरचा परिसर शंभर टक्के पॅक केलेला आहे. परिणामी या परिसरातील धान्य दुकानात धान्य पोहोचवण्यात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना धान्य वाटपात विलंबाची शक्‍यता आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cooking Oil Rule: खाद्यतेलाच्या पॅकेटमध्ये मोठा बदल! ९०० आणि ९५० ML चे पॅक बाजारातून गायब होणार; ९ स्टँडर्ड साइजमध्येच तेल मिळणार

Pune Water Issue : पाणी कपातीवर दोन दिवसात निर्णय

Beed ACB: पापाचा घडा भरला! स्वतःला सिंघम समजणारा तहसीलदार निघाला महालाचखोर; ६ लाख ४० हजार रुपये घेताना अटकेत

Pune Crime : प्रेमप्रकरणातून तरुणाने संपविले जीवन; कोरेगाव पार्कमधील प्रकार, पाच जणांवर गुन्हा

DCM Sunetra Pawar : माळेगाव'चे शेतकऱ्यांना २०० रुपये कांडे पेमेंट जाहीर

SCROLL FOR NEXT