Ahir-Phatak group fighting in the Walava; Rumors of a shooting 
पश्चिम महाराष्ट्र

अहिर-फाटक गटात वाळव्यात हाणामारी; गोळीबाराची अफवा

तानाजी टकले

आष्टा (जि. सांगली) ः पूर्ववैमनस्यातून वाळवा येथील अहिर व फाटक कुटुंबात जोरदार धुमश्‍चक्री झाली. तलवार, काठी, कोयता, गज आणि सत्तुराच्या सहाय्याने एकमेकांवर हल्ले करण्यात आले. या प्रकरणी अंकुश भगवान अहिर व नेताजी महादेव फाटक यांनी आष्टा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. त्यानुसार दोन्ही गटांच्या 12 जणांवर गुन्हा नोंद झाला.

अंकुश यांच्या फिर्यादीनुसार रणजित महादेव फाटक, नेताजी महादेव फाटक, महादेव फाटक व इतर चार जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. नेताजी यांच्या फिर्यादीनुसार शारद आनंदा अहिर, प्रमोद आनंदा अहिर, अंकुश भगवान अहिर, रोहन अंकुश अहिर, अतुल पोपट अहिर, अधिक पांडुरंग अहिर, विशाल पोपट अहिर यांच्यावर गुन्हा नोंद झाला. या मारामारीवेळी हवेत गोळीबार झाल्याची चर्चा जिल्हाभर पसरली. पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्यासह पथकाने तत्काळ भेट देऊन माहिती घेतली. मात्र, गोळीबाराची अफवा ठरली. 

अंकुश याच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सांगितले, ""अतुल पोपट अहिर यांच्या मोटारसायकलीवरून शेताकडे जात असताना आरोपींच्या जमावाने अंकुश याला अडविले. रणजित फाटक याने अंकुशला पोलिस ठाण्यात तक्रार का दिली, याचा जाब विचारत हल्ला केला. त्याने तलवारीने अंकुशच्या डोक्‍यात, डाव्या हातावर वार केले. नेताजी याने पहारीने अतुलच्या डोक्‍यावर वार करून जखमी केले. महादेव याने अंकुशचा मुलगा रोहन याच्या डाव्या दंडावर कोयत्याने वार करून जखमी केले. दोन अनोळखी व्यक्तींनी काठ्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली.'' 

नेताजी फाटक याच्या फिर्यादीनुसार, ""आज सकाळी साडेनऊच्या सुमारास अहिर यांनी संगनमत करून शिवीगाळ करीत नेताजी यांच्या घरात घुसून हल्ला केला. शरद व प्रमोद यांनी नेताजी यांना पकडून ठेवून रोहन याने तलवारीने नेताजी यांच्या उजव्या हाताच्या बोटावर मारून जखमी केले.

रोहन अहिर याने नेताजी यांच्या आईच्या डोळ्यांत चटणी टाकून, अतुल याने रणजित याच्या डोक्‍यात व पाठीवर काठीने मारहाण केली. अधिक अहिर याने नेताजी यांच्या आईस मानेवर मारले. विशाल याने महादेव यास लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून जखमी केले. नेताजी यांच्या घरातील खुर्च्या, पंखा, दिवाण, घड्याळ अशा साहित्याची मोडतोड केली.'' 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT