2252018.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

अन्‌ लाल मिरचीही भडकली .... 

शिवाजीराव चौगुले

शिराळा : मार्च, एप्रिल महिन्यात चटणी करण्यासाठी महिलांची मिरची कांडपवर महिलांची गर्दी असते. या दोन महिन्यात वर्षभर पुरेल एवढी चटणी करून ठेवतात. कडक ऊन असल्याने खुरवड्या, भातवड्या, वेपर्स, पापड,सांडगे केले जाते. गतवर्षी केलेली चटणी संपत आली आहे.

कोरोनाच्या धास्तीने आता ग्रामीण भागातिल नोकरी निमित्त बाहेर गेलेले लोक गावी आले असल्याने घरोघरी लोकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे चटणी कमी व खाणाऱ्या लोकांची संख्या जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता चटणी कमी पडू लागली आहे.लॉक डाऊन मुळे मिरचीचे दर ही भडकले असून ती ही पुरेशी उपलब्ध होत नाही. मिरची कांडप बंद अडल्याने मिरची कुटायची कशी याची चिंता महिलांना लागली आहे.

घरी असल्याने व सकाळी नास्तासाठी बेकरीचे पदार्थ खायला मिळत नाहीत. वाडा पाव ही लॉक डाऊन ने लॉक झाला असल्याने बाहेरचे चटपटीत खाणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यामुळे मुलांना घरात काय खायला घालायचे याची ही चिंता महिलांना पडली आहे. खुरवड्या,भातवड्या,शेवया, वेपर्स करण्यासाठी बटाटे व इतर साहित्याचे दर वाढल्याने उन्हाळी साहित्य कसे करायचे यांची चिंता महिलांना लागली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HDFC नंतर आता 'या' बँकांनीही वाढवले व्याजदर! कर्जदारांच्या EMI मध्ये वाढ निश्चित; लोन घेणाऱ्यांना मोठा झटका

Iran-America War: इराण-अमेरिकेत 'या' मुद्द्यांवर झाली सहमती? अणुकार्यक्रमावरही तोडगा निघाल्याची माहिती

IND vs AFG 1st ODI: विराटच्या जागी इशान किशन, हार्दिकच्या जागी रेड्डी... पहिल्या वन डे साठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : एसटी बसमधून गुजरातला विदेशी दारू तस्करीचा प्रयत्न; नंदुरबार पोलिसांची कारवाई

IND vs AFG 1st ODI: पाऊस थांबायचं नाव घेत नाही...षटकांची संख्या कमी होत चाललीय, आता ट्वेंटी-२० मॅच; जाणून घ्या कट ऑफ टाईम

SCROLL FOR NEXT