Fraud sakal
पश्चिम महाराष्ट्र

सावगाव भूनोंदणी प्रकरण : तहसीलदारांना दहा हजारांचा दंड

माहिती आयोगाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बेळगावच्या तहसीलदारांना माहिती आयोगाच्या आयुक्तांनी नुकताच दंड ठोठाविला आहे. सातत्याने कल्पना देऊनही माहिती देण्याबाबत हलगर्जीपणा करण्यासह माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत १० हजार रुपये दंड आणि २ हजार रुपये अर्जदारासाठी भरपाई म्हणून देण्याचा महत्वपूर्ण आदेश बजाविला आहे.

सावगाव गावातील एमआर क्रमांक एच १६-२०१६-१७ या जागेचे खातेबदल, वर्दी आणि नवीन नोंदणी जानेवारी २०१७ मध्ये करण्यात आली आहे. या संशयास्पद नोंदणीबाबत ॲड. लक्ष्मण पाटील यांनी २०१९ मध्ये माहिती हक्क अंतर्गत बेळगाव तहसीलदारांकडे विचारणा केली. तसेच जागेबाबतचा तपशिल आणि खातेबदल संदर्भातील कागदपत्रांची माहिती मागितली होती. मात्र, बेळगाव तहसीलदारांनी अर्जाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे अर्जदार ॲड. पाटील यांनी बेळगाव प्रांताधिकाऱ्यांकडे अपील केले. त्यांनी त्वरीत तपशिल देण्याबाबतचा आदेश तहसीलदारांना बजाविला. मात्र, त्यांचा आदेशही गंभीरपणे घेतला नाही. यामुळे अखेर अर्जदार ॲड. पाटील यांनी तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांच्याविरोधात राज्य माहिती आयोगाकडे धाव घेतली.

याठिकाणी अनेकदा सुनावणी झाली. या दरम्यानही तहसीलदारांना अर्जदारांना कागदपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी अनेकदा संधी दिली. मात्र, प्रत्येकवेळी वेळकाढू भूमिका आणि चालढकल करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे याबाबत २४ नोव्हेंबर रोजी अंतिम निकाल घोषित करण्यात आला आहे. त्यात माहिती हक्क आयोगाच्या आयुक्त गीता यांनी तहसीलदारांना माहिती हक्क आयोगाच्या कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत १० हजाराचा दंड आणि २ हजार रुपये अर्जदारांना भरपाई स्वरुपात देण्याचा आदेश बजाविला. सदरची दंडाची रक्कम वेतनातून कपात करण्याचे निर्देश आहेत. आदेशाच्या अंमलबजावणीचा आढावा पुढील सुनावणीला १४ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात येईल, असेही आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT