पश्चिम महाराष्ट्र

बेळगावसह परिसर कडकडीत बंद; मराठी भाषिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गावातील बससेवाही खंडित झाली असून बंदचे पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे.

मिलिंद देसाई

बेळगाव : बेळगावात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने (Maharashtra ekikaran samiti) पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. (Belgaum update) शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. अनेक गावातील बससेवाही खंडित झाली असून बंदचे पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. (Belgaum Band)

दरम्यान, कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी व्हॅक्सिन डेपो येथे सोमवारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड (kannad) गुंडांनी शाईफेक केली होती. याच्या निषेधार्थ समितीतर्फे बेळगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत मराठी भाषिकांनी सकाळपासूनच आपले व्यवहार बंद ठेवले असून सोमवारी रात्री काही ठिकाणी बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवाही (Transport Service) विस्कळीत झाली आहे. बसचे नुकसान होऊ नये यासाठी काही भागातील बससेवा परिवहन मंडळाने ठेवली आहे.

परिसरातील येळ्ळूर, बेळगुंदी, हिंडलगा आदी गावांमध्येही बंदला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या अनेक रस्त्यांवर पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असणाऱ्या पांगुळ गल्लीमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन पाठिंबा दर्शवला आहे. शहराबरोबरच खानापूर येथेही बंदला चांगला प्रतिसाद मिळला असून या भागातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT