Best from West open cage made for birds 
पश्चिम महाराष्ट्र

त्यांच्यासाठी बनवले बेस्ट फ्रॉम वेस्ट!

सकाळवृत्तसेवा

सांगली : कडक उन्हाळा, जोरदार पाउस व अन्य नैसर्गिक संकटांमुळे अन्न पाण्याविना पक्ष्यांची आबाळ होत असते. अनेकवेळा पक्षी मृत पावतात. हे ओळखून पशू, पक्षांप्रती जिव्हाळा असणाऱ्या येथील संवेदना फौंडेशनने टाकाउ पत्र्याच्या डब्यापासून बनवलेल्या खुल्या पिंजऱ्याची निर्मिती केली आहे.

विशेष म्हणजे या खुल्या पिंजऱ्याचे मोफत वितरण केले जात आहे. आतापर्यंत 100 पिंजऱ्यांचे वितरण या फौंडेशनने केले आहे. अशा 1 हजार पिंजऱ्यांचे वितरण करण्याचा संकल्प फौंडेशनचे रौनक शहा यांनी केला आहे. 

पशू पक्ष्यांप्रती भूतदया दाखवणाऱ्या अनेक संस्था, संघटना आहेत. मात्र त्यात सक्रिय असणाऱ्या मोजक्‍याच आहेत. सामाजिक कामावर भर देणाऱ्या संवेदना फौंडेशनतर्फे गोशाळा चालवली जाते. त्या गोशाळेतून निघणाऱ्या दुधापासून ताक करुन ते मोफत वाटले जाते. त्याचप्रमाणे अहिंसा, शाकाहार, परोपकाराची शिकवण वेगवेगळ्या धार्मिक उपक्रमातून दिली जाते. फौंडेशनतर्फे रिकाम्या, टाकाउ पत्र्याचे डबे गोळा करुन त्यापासून खुला पिंजरा तयार करण्यात येतो.

पत्र्याच्या डब्याच्या अर्ध्या भागातून तीन बाजू कापून त्या एकाच बाजूस दुमडल्या जातात. मध्ये खोलगट भागात पिण्यासाठी पाणी भरण्याची सोय आहे. तर दुमडलेल्या पत्र्यावर धान्य ठेवता येते. पक्ष्यांना सहजासहजी धान्य व पाणी डब्यावर बसून खाता पिता येते. असे 1 हजार खुले पिंजरे मोफत वाटण्याचा संकल्प रौनक शहा यांनी केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT