Bull sakal
पश्चिम महाराष्ट्र

Crocodile and Bullock : भिलवडीत कृष्णेत थरार; मगरींच्या तावडीतून बैलाची सुटका

भिलवडी येथे कृष्णा नदीपात्रात पडलेल्या व मगरींच्या तावडीत सापडलेल्या बैलाची नावाडी व युवकांनी चार तासांच्या धडपडीनंतर सुटका केली.

सतीश तोडकर

भिलवडी येथे कृष्णा नदीपात्रात पडलेल्या व मगरींच्या तावडीत सापडलेल्या बैलाची नावाडी व युवकांनी चार तासांच्या धडपडीनंतर सुटका केली.

भिलवडी - येथे कृष्णा नदीपात्रात पडलेल्या व मगरींच्या तावडीत सापडलेल्या बैलाची नावाडी व युवकांनी चार तासांच्या धडपडीनंतर सुटका केली. आटपाडी बाजारातून खरेदी करून या बैलाला येथे आणले होते.

घडले असे, की साठेनगरमधील अक्षय मोरे यांनी आटपाडी येथील बाजारातून ७० हजार रुपयांचा देशी बैल खरेदी केला. आज सकाळी आठ वाजता टेम्पोतून त्याला येथे आणले. गाडीतून खाली उतरत असताना ट्रॅक्टरचा हॉर्न ऐकून तो बुजला आणि दावे तोडून तो नदीकाठाला पळाला. जाताना त्याने अनेक शेत, वस्तीचे कुंपण तोडले, तसेच मोटारसायकलवर धावून जात त्यांची मोडतोड केली. नदीकाठाने कुरण परिसरातून तो शिवाजी लिफ्ट परिसरात गेला. युवकांनी त्याला पकडण्यासाठी दोरीचा फासा केला मात्र, तो चुकवित असताना नदीपात्रात पडला.

दुष्काळी भागातील असल्याने नदीचे पाणी पाहून तो सैरभैर झाला. पोहत तो पैलतीरावर अंकलखोपच्या दिशेने चालला. याच दरम्यान पात्रात तीन-चार मगरींनी त्याचा पाठलाग सुरू केला. मगरींना चकवा देत तो पोहत होता. अखेर त्याने पैलतीर गाठला. यावेळी काही अंतरावर मगरी फिरत होत्या. युवकांनी मदतीसाठी भुवनेश्वरीवाडीचे नावाडी नितीन गुरव यांना फोन केला. तत्काळ ते अवधूत नौका घेऊन आले. दोन-अडीच तासांच्या प्रयत्नानंतर त्याला पात्राबाहेर काढण्यात यश आले.

कृष्णा नदीत नागठाणे ते डिग्रज बंधाऱ्यादरम्यान मगरींचा अधिवास आहे. त्यांची संख्याही मोठी आहे. मार्च ते मेदरम्यान त्यांचा प्रजननकाळ असल्याने त्या अधिक आक्रमक असतात. त्यामुळे हा कालावधी नदीकाठावरील व्यक्ती व प्राण्यांसाठी घातक ठरतो.

भिलवडी-अंकलखोप परिसरात कृष्णेतील हरेक प्रकारच्या मदतीसाठी नावाडी नितीनचा हातखंडा आहे. महापूर काळात तो तारणहार ठरला. ब्रह्मनाळ बोट दुर्घटनाप्रसंगी त्याने मोलाची मदत केली. आजोबांकडून बाळकडू घेतलेला नितीन गेली अनेक वर्षे औदुंबर-भुवनेश्वरीवाडी दरम्यान अवधूत नौका चालवतो. बैलाच्या रेस्क्यूसाठी पंचवीसभर युवक चार तास झटत होते. नावाडी नितीनच्या अनुभवाची मदत उपयुक्त ठरली.

- अक्षय मोरे, बैलमालक, भिलवडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT