Changes in court time 
पश्चिम महाराष्ट्र

न्यायालयाच्या वेळेतही बदल, अतितात्काळ खटलेच चालणार

सकाळ वृत्तसेवा

नगर : "कोरोना' संसर्गाच्या भीतीमुळे न्यायालयीन कामकाजाची वेळ सकाळी 11 ते 2 करण्यात आली असून, अतितत्काळ खटल्यांचे कामकाज फक्त सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे आज सकाळी पक्षकारांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारात गर्दी केली होती. 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी जिल्हा न्यायालयासह सर्व न्यायालयांची कामकाजाची वेळ सकाळी 11 ते 2 अशी ठेवली आहे. या वेळेत न्यायालयातील वकिलांचा कक्ष, कॅंटीन बंद ठेवण्यात आली आहे. तसेच, अतितत्काळ खटल्यांचेच कामकाज आज सुरू ठेवण्यात आले होते. त्यात आरोपींचा जामीनअर्ज, मनाई हुकमाचे अर्ज, रिमांड, अशा केसेसचा समावेश होता. त्यामुळे ठरावीक वकिलांना न्यायालयात प्रवेश देण्यात आला.

पक्षकारांसाठी प्रवेशद्वारात माहिती सुविधा केंद्र तयार करण्यात आले आहे. तेथून त्यांना खटल्याच्या तारखांची माहिती मिळणार आहे. आज सकाळी पक्षकारांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारात गर्दी केली होती. अनेकांना माहिती सुविधा केंद्रातून खटल्याची पुढील तारीख देण्यात आली.

पहिलाच दिवस असल्याने जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या पक्षकारांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारात गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांना बंदोबस्त वाढवावा लागला. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचे सूत्रांकडून समजले. 

"लोकअदालत' पुढे ढकलली 
जिल्हा विधी न्याय प्राधिकरणामार्फत 11 एप्रिल रोजी विविध तंटे मिटविण्यासाठी "लोकअदालती'चे आयोजन करण्यात आले होते. मात्र, "कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ती 25 एप्रिल रोजी ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

Pune News : पुणे शहरातील २४ संवेदनशील ठिकाणी अंधाराचे साम्राज्य

SCROLL FOR NEXT