पश्चिम महाराष्ट्र

वाईकरांचा रायरेश्वरावर जागता पहारा

सकाळ वृत्तसेवा

वाई (जि. सातारा) : नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली धांगडधिंगाणा करायचा अशीच काही प्रथा रूढ होत असतानाच या सर्व प्रकारांना बगल देत येथील भटकंती सह्याद्री ग्रुप व शिवसह्याद्री करिअर ऍकॅडमीच्या सदस्यांनी श्री क्षेत्र रायरेश्वर पठारावर स्वच्छता मोहीम राबवत संपूर्ण गड परिसर चकाचक करून समाजापुढे एक नवीन आदर्श घालून दिला आहे.

नक्की वाचा -  चलो, बॅग उठाओ और निकल पडो 

रायरेश्वरावर प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. या ठिकाणी येणारे पर्यटक हे जागोजागी प्लॅस्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, गुटख्यांचे पॅकेट्‌स, दारूच्या बाटल्या, इत्यादी गोष्टी सर्रास फेकून देतात. त्यामुळे पठारावर अस्वच्छता पसरलेली होती. त्या पार्श्वभूमीवर भटकंती सह्याद्री परिवाराच्या सदस्यांनी 31 डिसेंबरला रायरेश्वर गडावर स्वच्छता मोहीम राबिवली. 

या मोहिमेत 50 सदस्य व रायरेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक श्री. जगताप हे सामील झाले. महादेव मंदिर परिसरातून स्वच्छता मोहिमेला सुरवात झाली. नंतर गोमुख कुंड परिसर, मंदिरापासून ते शिडीपर्यंतच्या मार्गातील सर्व कचरा उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली. या मार्गामध्ये सुमारे 20 पोती कचरा गोळा केला. स्वच्छता मोहिमत शाळेतील लहान मुलांना अनिल वाशिवले यांच्यातर्फे खाऊ आणि पुस्तक वाटप करण्यात आले.

हेही वाचा - थांबायचे नाय आता थांबायचे नाय ; शिवरायांच्या मावळ्यांचा निर्धार 

वन विभागाच्या सहकार्याने शिडीमार्गात असलेल्या चेकपोस्टवर येणाऱ्या पर्यटकांची नावनोंदणी व तपासून त्यांना पुढे सोडले गेले. परिवाराच्या सदस्यांनी रात्री 10 वाजेपर्यंत जागता पहारा दिला. या मोहिमेत ऍकॅडमीचे श्री. खरात आणि वनरक्षक प्रदीप जोशी यांचे मोलाचे योगदान लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य! प्रसाद लाड यांच्या हस्ते घेतलं पाणी, सलाईनही घेणार

Bidkin Bribe Case : टिपर सुरू ठेवण्यासाठी पोलिस हवालदाराची महिन्याला एक हजारांची मागणी; पोलिस हवालदारावर एसीबीच्या जाळ्यात

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SCROLL FOR NEXT