Congress MP Vishal Patil criticizes Suresh Khade esakal
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Patil : पालकमंत्र्यांनी पोलिस बळ वापरून 'रात्रीत खेळ' केला; असं का म्हणाले खासदार विशाल पाटील?

पोलिस यंत्रणा वापरून ‘रात्रीत खेळ’ करून मते वळवण्याचा उद्योग केला गेला. पण मिरजकरांनी दाखवले, आम्ही स्वाभिमानी आहोत.

सकाळ डिजिटल टीम

‘‘मराठा आरक्षणप्रश्‍नी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली. मनोज जरांगे-पाटील यांना दिलेला त्रास समाजाला आवडला नाही. त्याचा बदला समाजाने घेतला.’’

मिरज : ‘‘लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पोलिस बळाचा वापर करून रात्रीत खेळ करण्याचा प्रयत्न केला. ताकद लावली, मात्र मिरजेच्या स्वाभिमानी जनतेने त्यांचे ऐकले नाही,’’ अशी जोरदार टीका खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी मिरज येथे केला.

खासदार झाल्याबद्दल विशाल पाटील यांचा मिरज तालुका काँग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला. आमदार विश्‍वजित कदम (MLA Vishwajeet Kadam), विक्रम सावंत, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, डॉ. जितेश कदम, मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, सुरेश आवटी आदी व्यासपीठावर होते.

विशाल पाटील म्हणाले, ‘‘मिरज मतदार संघातून (Miraj Constituency) एक लाख १० हजार मतदान मिळाले. या मतदार संघाचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. खूप जोर केला, दबाव टाकला. आरोप आहेत की, पोलिस यंत्रणा वापरून ‘रात्रीत खेळ’ करून मते वळवण्याचा उद्योग केला गेला. पण मिरजकरांनी दाखवले, आम्ही स्वाभिमानी आहोत. २५ हजारांवर मताधिक्य दिले गेले. आता विधानसभेला प्रामाणिक काम करणारा माणूस येथून निवडून द्यायचा आहे.’’

आमदार विश्‍वजित कदम म्हणाले, ‘‘मिरज शहर, तालुक्याचे प्रश्‍न आपणास सोडवायचे आहेत. मिरज विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे. एक सक्षम उमेदवार देण्याबाबत विचार सुरू आहे.’’ माजी महापौर किशोर जामदार, मैनुद्दीन बागवान, संजय मेंढे, आनंदा देवमाने, संभाजी मेंढे, बाबगोंडा पाटील, प्रा. सिकंदर जमादार, बाळासाहेब होनमोरे, विज्ञान माने, इंद्रजित घाटे, निरंजन आवटी आदी उपस्थित होते.

फडणवीसांवर टीका

खासदार विशाल पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणप्रश्‍नी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली. मनोज जरांगे-पाटील यांना दिलेला त्रास समाजाला आवडला नाही. त्याचा बदला समाजाने घेतला.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT