corona new logo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

निंबवडे येथे दोघांना कोरोना : तालुक्‍यात आतापर्यंत 23 रूग्ण सापडले 

सकाळवृत्तसेवा

आटपाडी (सांगली)- निंबवडे (ता. आटपाडी) येथे मुंबईहून आलेल्या दोन वेगवेगळ्या कुटुंबातील दोघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यापैकी एक 58 वर्षाचा पुरूष आणि 65 वर्षाची महिला आहे. प्रशासनाने हे दोन्ही रुग्ण राहत असलेला परिसर "कंटेनमेंट झोन' म्हणून जाहीर केला असून तो "सील' करण्याची कारवाई सुरू केली आहे. आणखी दोन रूग्ण सापडल्यामुळे आटपाडी तालुक्‍यात एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या तेवीसवर पोहोचली आहे. तर आतापर्यंत सात जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. 


निंबवडे येथे मुंबईहून एक कुटुंब पंधरा दिवसापूर्वी आले होते. त्यांना शाळेत क्वारंटाईन केले होते. त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपल्याने कालच त्यांना घरी सोडले होते. तर दुसऱ्या रुग्णाच्या कुटुंबांला राहत्या घरी क्‍वारंटाईन केले होते. आरोग्य विभागाने तालुक्‍यात बाहेरून आलेल्या व्यक्तींचे घशाचे स्त्राव तपासणीसाठी घेतले होते. त्यात निंबवडेतील दोन 65 वर्षाची महिला आणि 58 वर्षाचा पुरूष अश दोघांचा कोरोना अहवाल "पॉझिटिव्ह' आला. दोघेजण मुंबईवरून गावी आले होते. यातील एका रुग्णांमध्ये प्राथमिक लक्षणे आढळून आली होती. तर दुसऱ्या रूग्णांमध्ये कोणतीही प्राथमिक लक्षणे आढळून आली नव्हती. तसेच त्यांचा क्‍वारंटाईन कालावधीही संपला होता.

निंबवडेत एकाच दिवशी दोन रुग्ण सापडल्यामुळे पोलीस, प्रशासन आणि आरोग्य विभागाची धावपळ उडाली आहे. तहसीलदार सचिन लंगोटे, तालुका वैद्यकीय अधिकारी साधना पवार यांनी गावाला भेट देऊन रुग्ण राहत असलेला परिसर सील करण्याची कारवाई सुरू केली. तसेच ग्रामस्थांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आणि दक्ष राहण्याचे आदेश दिले. या दोन रुग्णाच्या हाय रिस्क संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू केला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Dilip Walse Patil Meeting : सिल्व्हर ओकवर शरद पवार-दिलीप वळसे पाटील यांची भेट; चर्चांना उधाण, दोन्ही गट एकत्र येणार?

किती रुपयांत बुक करू शकता नवी कोरी Tata Tiago EV फेसलिफ्ट? जाणून घ्या बूकिंगची साधी सोपी प्रोसेस

वडील भारताकडून खेळू शकले नाहीत, पण पोरगा आता FIFA World Cup खेळणार! कोण आहे तो जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये गेवराईत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Nagpur News नागपुरात पोलिसांवर हल्ला, कार अंगावर घालण्याचा प्रयत्न, महिला पोलिसाला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT