0corona_498.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यात कोरोना रुग्ण! आज नव्या 12 रुग्णांची भर; एकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज (रविवारी) 12 नव्या रुग्णांची भर पडली असून आता कोरोनाचा संसर्ग सर्वच तालुक्‍यात वाढू लागला आहे. रविवारी घोडा तांडा येथील एका 64 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आता रुग्णांची संख्या 532 झाली आहे. आज 24 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून अद्याप 288 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

रविवारी (ता. 5) उत्तर सोलापुरातील मार्डी, नान्नज, बेलाटी येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तर दक्षिण सोलापुरातील नवी विडी घरकूल, हत्तूर, मुळेगाव, बोरामणी येथेही प्रत्येकी एका रुग्णांची भर पडली आहे. तसेच अक्‍कलकोट तालुक्‍यातील जेऊरवाडीत एक, तर बार्शीतील कसबा पेठ, सुखदेव नगर, बारंगुळे प्लॉट, उपळाई रोड येथे प्रत्येकी एक रुग्ण नव्याने आढळला आहे. 

तालुकानिहाय उपचार घेत असलेले रुग्ण 
अक्‍कलकोट (60), दक्षिण सोलापूर (88), बार्शी (66), करमाळा व माढा प्रत्येकी (4), माळशिरस, मंगळवेढा, सांगोला प्रत्येकी (1), मोहोळ (13), उत्तर सोलापूर (32) आणि पंढरपूर (18) अशाप्रकारे एकूण 288 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

ठळक बाबी... 

  • - रविवारी (ता. 5) ग्रामीण भागात सापडले नवे 12 कोरोना पॉझिटिव्ह 
  • - घोडा तांडा (ता. दक्षिण सोलापूर) येथील 64 वर्षीय पुरुषाचा झाला मृत्यू 
  • - जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 532; त्यामध्ये पुरुष 339 तर 193 महिलांचा समावेश 
  • - आतापर्यंत 219 रुग्णांची कोरोनावर मात; सध्या 288 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 
  • - संस्थात्मक विलगीकरणात 854 तर होम क्‍वारंटाईनमध्ये आहेत एक हजार 649 संशयित 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजित दीपके यांनी सांगितली तारीख, दिला मोठा इशारा

पुणे मिरज मार्गावर २१ दिवसांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले, प्रवाशांचे हाल

"तुमची गावठी मराठी नाही पाहिजे" कुंडली भाग्यच्या सेटवर दिग्दर्शकाने केलेला कमळी फेम अभिनेत्रीचा अपमान

Latest Marathi News Live Update : युद्धाच्या परिणामामुळे इंधन दरात वाढ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

Konkan Railway: पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज; रात्रीच्या गस्तीला विशेष महत्त्व, चोवीस तास वॉचमन तैनात

SCROLL FOR NEXT