The decision to make the Get Set Go app available on the Google Play Store belgaum marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

सीईटी, निट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गेट सेट गो, ऑनलाईन प्रशिक्षण देण्यास सुरुवात....

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : लॉकडाऊनमुळे सीईटी व निट परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी उच्च शिक्षण खात्याने पावले उचलली आहेत. यासाठी सोमवारपासून गेट सेट गो या नावाने ऑनलाईन प्रशिक्षणास सुरवात करण्यात आली आहे त्यामुळे सीईटी व निट देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. 

लॉकडाऊनमुळे शिक्षण संस्था तसेच सीईटी व निटसाठी प्रशिक्षण देणाऱ्या सर्व संस्था बंद झाल्या आहेत त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर संकट निर्माण झाले असुन राज्यातील काही खाजगी वर्ग घेणाऱ्या संस्था सीईटी व निटबाबत विद्यार्थांना ऑनलाईन प्रशिक्षण देत आहेत मात्र परीक्षा देणाऱ्या राज्यातील सर्व विद्यार्थाना ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी शिक्षण खात्याने गेट सेट गो या नावाने ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

वैद्यकीय, दंत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निट तर इंजिनियरींग, आर्कीटेक्‍ट आदी अभ्यासक्रमासांठी सीईटी किंवा निट परीक्षा देणे आवश्‍यक आहे. यावेळी सीईटी व निट देण्यासाठी राज्यातील 1,94, 200 विधार्थांनी नोंदणी केली आहे या सर्व विद्यार्थांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली आहे. ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा तसेच 3 मे नंतर निट व सीईटी परीक्षेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती दिली आहे.

गुगल प्ले स्टोअरवर करा अँप

www.getsetgo.in या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रशिक्षण मिळणार असून लवकरच उच्च शिक्षण खात्याने गुगल प्ले स्टोअरवर गेट सेट गो अँप उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईनद्वारे विविध प्रकारची माहिती देण्याबरोबरच व्हिडीओही उपलब्ध होणार आहेत त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यास विद्यार्थ्यांना मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT