"E-claim" system for claim entry 
पश्चिम महाराष्ट्र

हक्काच्या नोंदीसाठी "ई-हक्क' प्रणाली

सकाळ वृत्तसेवा

नगर ः वारस नोंद, बोजा, गहाणखत, बोजा कमी करणे, ई-करार नोंदी, मृताचे नाव कमी करणे, विश्‍वस्तांचे नाव बदलणे आदी आठ प्रकारच्या फेरफारसाठी अर्ज करण्यासाठी खातेदाराला वारंवार तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. मात्र, आता इंडिया भूमिअभिलेखाचे आधुनिकीकरणांतर्गत ई-हक्क प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. या प्रणालीमुळे खातेदारांना वेगवेगळ्या हक्काच्या नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे तलाठ्यांच्या कामकाजात गतिमानता, पारदर्शकपणा येणार आहे. खातेदारांच्या वेळ, अनाठायी पैशांची बचत होणार आहे. 

खातेदाराला तलाठी कार्यालयाकडे सात-बारावर हक्‍काच्या नोंदी फेरफारच्या स्वरूपात घेण्यासाठी अर्ज करावे लागतात. यापुढे ते अर्ज ऑनलाइन दाखल करता येतील. प्रणालीचा वापर खातेदारांसह बॅंका, सहकारी सोसायट्या, पतसंस्थांनादेखील वापरता येईल. त्यासाठी बॅंक प्रतिनिधी, सोसायटी सचिव व खातेदार यांना hpps:// pdeigr.maharashtrs.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, पॅन कार्ड नंबरची माहिती द्यावी लागणार आहे. ऑनलाइन अर्ज दाखल करताच खातेदाराला अर्जाच्या प्रतीसह संकेतांक क्रमांक मिळेल. त्या आधारे अर्जाची स्थितीही पाहता येणार आहे. 

नागरिकांचा वेळ, पैसा वाचणार 

या प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ, पैसा व त्रास वाचणार आहे. तसेच महसुल कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. नागरिकांच्या चकरा आणि अडवणूक कमी होणार आहे. तसेच गैरव्यवहार कमी होणार आहे. नागरिकांना घरबसल्या नोंदीसाठी ऑन लाईन अर्ज करता येणार आहे. 

तलाठ्यांच्या कामात येणार गतिमानता 

ई-हक्‍क प्रणालीद्वारे खातेदाराचा अर्ज तलाठ्यांना ई-फेरफारमध्ये प्राप्त करता येऊन फेरफारमध्ये रूपांतरित करता येणार आहे. ही प्रणाली ई-फेरफार प्रणालीशी संलग्न करण्यात आली आहे. प्रणालीच्या वापरामुळे तलाठ्यांच्या कामकाजात गतिमानता व पारदर्शकता येण्यास निश्‍चित मदत होणार आहे. 
- ऊर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भीमाशंकरमध्ये खरंच झाडांची कत्तल? व्हायरल व्हिडीओनंतर वनविभागाचं मोठं स्पष्टीकरण

Brazil Election : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! ब्राझीलमध्ये फ्लॅव्हियो बोल्सोनारो यांचा पराभव करत लुला चौथ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी

Livestock Insurance Scheme : पशुधन विम्यासाठी आता 85 टक्के अनुदान; एका कुटुंबातील 10 जनावरांना मिळणार विमा संरक्षण, पशुपालकांना मोठा दिलासा

Maharashtra Live News : कर्जतमध्ये राज ठाकरे सभा घेणार

Jio IPO Allotment Status: जिओचे शेअर्स मिळाले की नाही? एका क्लिकवर चेक करा स्टेटस; लिस्टिंग कधी? पाहा अपडेट

SCROLL FOR NEXT