EXTRA MARITIAL AFFIAR 
पश्चिम महाराष्ट्र

आठ लाख नवरा-बायको एकमेकांना फसवतात, डेटिंग अँपमुळे दोघांत तिसरा 

सकाळ वृत्तसेवा

आठ लाख भारतीय बाहेरख्याली, विवाहबाह्य संबंधासाठी डेटिंग अॅपचा वापर 

नगर ः कुटुंब संस्था ही भारतीय संस्कृतीचा कणा आहे. त्याच्याच आधारावर ही संस्कृती टिकून आहे. पती-पत्नी हा त्याचा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, अलिकडे या पवित्र नात्यात दोघात तिसरा किंवा तिसरी आली आहे. त्यामुळे या नात्याला तडा जाऊ पाहत आहे. विववाहबाह्य संबंध ठेवण्यात भारतीय पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करीत आहेत. तब्बल आठ लाख भारतीयांनी जोडीदाराचा हात सोडून दुसऱ्याचा हात धरला आहे. यात केवळ पुरूषच नाही तर महिलाही आघाडीवर आहेत. विवाहबाह्य संबंधासाठी त्यांनी डेटिंग अॅपचा वापर केल्याने ही आकडेवारी उजेडात आली आहे. हा अॅप न वापरणाऱ्यांची संख्या वेगळीच. ही आकडेवारी चक्रावून टाकणारी आहे. 

पुणे, नागपुरात आले लोण 
जे पुरूष पत्नीपासून दूर राहतात किंवा महिला दुसऱ्या गावी नोकरी करतात, त्यांची संख्या या डेटिंग अॅपवर सर्वाधिक आहे.अर्थातच तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. हे लोण अगदी आपल्या पुणे, नागपूरपर्यंत आले आहे. मुंबई, पुणे, नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, गुडगाव, जयपूर, चंदीगड, लखनऊ, नागपूर, सुरत, इंदौर, विशाखापट्टणम या शहरांतील जास्त युजर्स आहेत. जानेवारी महिन्यात सर्वात युजर्स वाढले आहेत. 

महिन्यात तब्बल ६०० टक्के वाढ 
हे एस्क्ट्रा मॅरीटल टेटिंग अॅप फ्रान्सचे आहे. त्यावर तब्बल ५६७ टक्के युजर्सची वाढ झाली आहे. ही वाढ भोवळ आणणारी आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत ही वाढ तब्बल ३०० टक्के आहे. सन २०१९मधील जानेवारी महिन्यातही हीच स्थिती होती. एकंदरीत नाताळाची सुट्टी संपल्यानंतर ही आकडेवारी वाढत असल्याचे समोर आले आहे. कुटुंब व्यवस्थेला महत्त्व देणाऱ्या भारतीय संस्कृतीवर एक प्रकारचा घाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. समाजशास्त्रज्ञांना या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Gen Z Protest: कोण आहे नेपाळचा 'हिटलर राऊत'? जनरेशन झेडच्या लढ्याचं केलं नेतृत्व

हाच बंगला पाहिजे! कलाकेंद्रातल्या नर्तकीवर लाखोंची दौलत उधळली तरी हट्ट संपेनात; गोविंद बर्गेंच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक खुलासे

Pune Crime : पुण्यात चाललंय काय? नवऱ्याकडून मूल होणार नाही, माझ्याशी संबंध ठेव; माजी सहाय्यक पोलिस आयुक्ताचा सुनेवर बळजबरीचा प्रयत्न अन्...

Nepal Violence : नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचार; तुरुंग फोडून पळून जाणाऱ्या कैद्यांवर लष्कराकडून गोळीबार; दोन ठार, 12 जण जखमी

Nagpur Robbery: व्यापाऱ्यावर गोळीबार; चार लाख लुटले : कडबी चौकातील घटना, हवेत दोन राऊंड फायर

SCROLL FOR NEXT