Fear of the "thumb" in land deal 
पश्चिम महाराष्ट्र

इथे खरेदी व्यवहारात "अंगठ्या'ची भीती 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः जमीन, घर व अन्य मालमत्तांच्या खरेदी विक्री व्यवहारात ऑनलाईन नोंदणीसाठी "अंगठा' दाखवण्याची गरज असते. तोच अंगठा आता भीती दाखवू लागला आहे. कोरोनाची धास्ती हे व्यवहार करणाऱ्या सर्वच यंत्रणेला वाटू लागली आहे. विशेषतः प्रत्येक व्यवहाराची जबाबदारी असलेल्या निबंधकांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे हे व्यवहार काही काळासाठी थांबवावेत किंवा ऑफलाईन करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

कोरोना विषाणूचा फैलाव हा हवेतून होत नाही. त्याच्या संपर्कात थेट आल्याशिवाय तो पसरत नाही. त्यामुळे गर्दी टाळावी, असा प्रयत्न राज्य शासनानेही चालवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयातील अंगठा दाखवून हजेरी नोंदवण्याची पद्धत तूर्त स्थगित करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील नोंदणी कार्यालयातील व्यवहारांबाबतही तेच धोरण राबवावे, अशी मागणी आता जोरात पुढे आली आहे. 

प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी खरेदी, विक्रीचे व्यवहार निबंधक कार्यालयात होतात. तेथे खरेदी करणारा, विकणारा, खरेदी करणाऱ्याचा साक्षीदार आणि विक्री करणाऱ्याचा साक्षीदार असे किमान चार लोक आवश्‍यकच असतात. विक्री करणाऱ्यांची संख्या बहुतांशी वेळी एकापेक्षा अधिक असते. कधी-कधी एका व्यवहारात पंधरा ते वीस लोक असतात. या प्रत्येकाला बायोमेट्रीक पद्धतीने अंगठा यंत्रावर लावून आपली मान्यता किंवा साक्ष नोंदवावी लागते. हे सगळे झाल्यानंतर निबंधकांना अंगठा यंत्रावर ठेवून त्यांची मान्यता द्यावी लागते. असे दररोज किमान पंधरा ते वीस व्यवहार हमखास होतात. काही वेळा ते पन्नासपर्यंत जातात. एवढ्या वेळा आणि एवढ्या साऱ्या लोकांच्या हाताचा थेट संपर्क येणार असेल तर निबंधकांनी करायचे काय? भीती बाळगायची नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

त्यामुळे हे व्यवहार काही काळ ऑफलाईन करावेत किंवा 31 मार्चपर्यंत अशा व्यवहारांना सुटी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष असणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिऱ्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलो, आठवड्याला १०-१२ कोटी उडवतो; ललित मोदींनी सांगितलं एवढा पैसा येतो कुठून?

Gulabo-Sitabo: देवरानी-जेठानीचे भांडण अन् १८५७ च्या क्रांतीत देशप्रेमाची ठिणगी! गुलाबो-सिताबो पपेट शोचे काय आहे बच्चन कनेक्शन?

Veer Savarkar : सावरकरांनी दिलेला दुधाचा पेला आजही स्मरणात; 90 वर्षांच्या उषाताईंनी जागवली स्वातंत्र्यवीरांच्या भेटीची 'ती' दुर्मिळ आठवण

State Museum: ३,००० वर्षे जुनी इजिप्तची 'ममी' अन् ऐतिहासिक नाणी मोफत पाहण्याची सुवर्णसंधी! राज्य संग्रहालयाचा मोठा निर्णय!

'लग्न करेन तर अशोकचीच' अशोक सराफ आणि निवेदिता यांचं कसं जमलं? सचिन पिळगांवकरांची मिळाली मोलाची साथ

SCROLL FOR NEXT