Garvare College team wins the Vikhe Debate Competition marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

विखे वाद-विवाद स्पर्धेत पुण्याचा बोलबाला

सतीश वैजापूरकर

शिर्डी : प्रवरानगर येथील पीव्हीपी महाविद्यालयातील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेत पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा संघ फिरत्या चषकाचा मानकरी ठरला. 

स्पर्धेसाठी "एकविसाव्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहेत,' असा विषय होता. नगर, धुळे, नाशिक, औरंगाबाद, पुण्यासह राज्यभरातील वरिष्ठ आणि कनिष्ठ सुमारे 30 महाविद्यालयांतून 60 स्पर्धक सहभागी झाले होते. यात 37 मुलींचा समावेश होता. "नासा'च्या अभियंत्या नाशिक येथील अपूर्वा जाखडी यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. 

गरवारे महाविद्यालयाने पटकाविला फिरता करंडक

पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील निखिल बेलोटे आणि अश्‍विनी टावरे यांच्या संघाला फिरता करंडक आणि रोख पारितोषिक देण्यात आले. वरिष्ठ गटात द्वितीय क्रमांक पद्‌मश्री विखे पाटील महाविद्यालयातील सुमीत मेहेत्रे आणि तृतीय क्रमांक पुणे जिल्ह्यातील वारजे येथील महाविद्यालयातील सुमीत काळगे याला, तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक लोणीच्या कृषी महाविद्यालयातील ऋषिकेश चोळके याला, कनिष्ठ गटात संगमनेर येथील विशाल कानवडे याला प्रथम, प्रवरा कन्या विद्यामंदिराची हृतिक वाघ या विद्यार्थिनीला द्वितीय, प्रवरा पब्लिक स्कूलच्या करुणा जगताप हिला तृतीय आणि पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील आकांक्षा पवार हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. 

शालिनी विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सदस्य आणि सचिव भारत घोगरे, परीक्षक आर. बी. एन. बी. महाविद्यालयातील डॉ. उज्ज्वला भोर, शेवगाव येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रा. ओंकार रसाळ, संगमनेर महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्राचे समन्वयक व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. अशोक लिंबेकर, प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, प्रा. दत्तात्रय थोरात आदी उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ. रामचंद्र रसाळ यांनी प्रास्ताविक केले. संयोजन समितीचे प्रा. उत्तम येवले, प्रा. डॉ. राजेंद्र सलालकर, प्रा. अनिल गाढवे, डॉ. वैशाली मुरादे, डॉ. भाऊसाहेब रणपिसे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे कार्याध्यक्ष डॉ. शांताराम चौधरी यांनी आभार मानले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT