पश्चिम महाराष्ट्र

जागेचा ताबा मिळवण्यासाठी महिलेचा विनयभंग, सामानाची मोडतोड दहा जणांवर गुन्हा

सुदर्शन हांडे

बार्शी - घराच्या जागेचा ताबा मिळविण्यासाठी जागा मालकाने घरात शिरून साहित्यांची तोडफोड करत गर्भवती महिलेस मारहाण करून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी बार्शी शहर पोलिसात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी की येथील तानाजी चौक येथे संभाजी माने यांच्या कुटुंबियांच्या मालकीची जागा आहे. या जागेत पीडित महिला व तिचे परिवार मागील तीन पिढ्यानपासून राहत आहे. या बाबत दोन्ही कुटुंबात एकमेका बाबत तक्रारी आहेत. सोमवारी (ता १) दुपारी पीडित महिला व तिची ननंद घरी असताना दहा ते पंधराजण अचानक घरात शिरून शिवीगाळ करून घरातील संसारउपयोगी साहित्याची तोडफोड केली. तसेच घरातील समान बाहेत टाकून दिले व मारहाण केली. याचवेळी पीडित महिलेने मी गर्भवती आहे असे सांगितले असता माने याने तुझे खाली होऊ दे, मी तुला गर्भवती करतो असे लज्जा वाटेल असे वर्तन केले. दरम्यान पीडितेचा पती मध्ये आला असता त्याच्या डोक्यात वीट मारून त्यास जखमी केले. तसेच सोन्याची चेन, मंगळसूत्र, अंगठी, मोबाईल असे सुमारे एक लाख २४ हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग घेऊन गेले असल्याची फिर्याद बार्शी शहर पोलिसात दाखल झाली आहे. या प्रकरणी अनिल माने, बाळासाहेब माने, आकाश माने व इतर असे दहा जणांवर विनयभंग, मारहाण, घरात घुसून साहित्याचे नुकसान, ऐवज घेऊन जाणे प्रकरणी गुन्ह दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply : पुण्यात एक दिवसाआड पाणी? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; वेळापत्रक तयार करण्याचे आदेश

Nagpur News : पोलिस कर्मचाऱ्याने स्नेहाची मृत्यूपूर्वीची चिठ्ठी रेकॉर्डवर घेतलीच नाही; चौकशीत झाले उघड

Shivrajyabhishek Din : स्वराज्याची राजधानी तेजोमय! शिवभक्तांचा मार्ग झाला प्रकाशमय

Sakal Vidya Education Expo 2026 : एकाच छताखाली करिअरच्या दिशा; गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते आज प्रदर्शनाचे उद्‌घाटन

Mohol News : विवाहितेचा मृत्यू डॉक्टरच्या हायगयीने झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; नातेवाईकांनी डॉक्टरवर कारवाईसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT