HE SAID I WILL COME 
पश्चिम महाराष्ट्र

VIDEO व्हायरल ः काय भानगडय, तो पुन्हा म्हणाला, मी पुन्हा येईन

सकाळ वृत्तसेवा

नगर ः महाराष्ट्रात काही वाक्य परवलीची झाली आहेत. त्यात मी पुन्हा येईन या वाक्याने तर धुमाकूळ घातला आहे. हे वाक्य उच्चारले तरी अनेकांना धडकी भरते. भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वाक्य विधानसभेत तसेच प्रचारादरम्यान उच्चारले होते. त्यांच्या आत्मविश्वासामुळे विरोधकांची पाचावर धारण बसली होती. शिवसेनेने पाठिंबा दिलेला नसतानाही त्यांनी एका रात्रीतून आपले सरकार बनविले होते. परंतु ते सरकार काही तासांचेच ठरले. मग मात्र मी पुन्हा येईन या वाक्याची राळ उठविण्यात आली. हे आत्मविश्वासाचे वाक्य चेष्टेचा विषय बनले. सोशल मीडियात ते चांगलेच ट्रोल होते आहे. आताही त्याची पुनरावृत्ती होते आहे.

दरम्यानच्या काळात ठाकरे सरकार बनले. ते रडतखडत का होईना पण सुरू आहे. त्यातच मी पुन्हा येईन अशी हाळी एकाने दिलीय, त्यामुळे पुन्हा त्याचीच चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच त्याने केलेली ही गर्जना सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियात सुरू असलेली चर्चा नेमकी काय आहे,

नेमकं काय आहे...

याची उत्सुकता नक्कीच असेल. तर ती आहे रायगड जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याची. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्याने छत्रपती शिवाजीमहाराजांविषयी भाषण केले. ते भाषण खरोखरच आत्मविश्वासपूर्ण होते. त्याच्या प्रत्येक वाक्यातून आत्मविश्वास डोकावत होता. मात्र, त्याच्या बोबड्या बोलामुळे उपिस्थितांना काही कळत नव्हते. तरीही प्रत्येकजण त्याला दाद देत होता. काहींनी तर त्या चिमुरड्याचे ते भाषण कुतूहलाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. भाषणाच्या शेवटी तो म्हणतो, मी आता जातो, परंतु पुढच्या वर्षी नक्की पुन्हा येईन... मी पुन्हा येईन. हे वाक्यावर तर उपस्थित असलेल्यांसह सर्वांनाच हसू आवरत नाही. प्रजासत्ताक दिनासाठी आलेले पाहुणेही त्या भाषणाने हसून लोटपोट होतात. सध्या सोशल मीडियात त्या चिमुरड्याच्या भाषणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरला होतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, मन जिंकणारे विधान; म्हणाला, तो नसता तर मी इथे उभा नसतो

ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT