Corona JN.1 Variant esakal
पश्चिम महाराष्ट्र

सिंधुदुर्ग, कोल्हापूरनंतर आता सांगलीत सापडले कोरोनाचे 'इतके' रुग्ण; सर्दी, खोकल्याचा जाणवू लागला त्रास

सांगली शहरात (Sangli City) कोरोनाने (Coronavirus) पुन्हा शिरकाव केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सांगली शहरातील उस्मानाबाद परिसरात एका पुरुषास सर्दी-खोकल्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.

सांगली : सांगली शहरात (Sangli City) कोरोनाने (Coronavirus) पुन्हा शिरकाव केला आहे. विश्रामबाग परिसरातील एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. दोघांचीही तपासणी करण्यात आली असून, त्यांचे नमुने पुण्याला पाठवण्यात येणार आहेत.

दोघांचीही प्रकृती सामान्य असल्याचे सांगण्यात आले. सांगली शहरातील उस्मानाबाद परिसरात एका पुरुषास सर्दी-खोकल्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीचीही चाचणी करण्यात आली.

त्यांचे अहवाल आले. त्यामध्ये दोघेही कोविड पॉझिटिव्ह (Covid Positive) असल्याचे स्पष्ट झाले. दोघांनाही कोविडची लागण झाल्याचे समजतात महापालिकेचे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी या रुग्णांची भेट घेतली. त्यांचे रिपोर्ट तपासले व त्यांची गेल्या महिन्याभरातील माहितीही घेतली. यातील पुरुष रुग्णाला सर्दी, खोकल्याचा त्रास असल्याने त्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली.

मात्र, त्यांच्या पत्नीस कसलाही त्रास नसतानाही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. घरात दोघेच राहतात. तरीही महापालिका आरोग्य विभागाने परिसरातील नागरिकांचाही आज सर्व्हे केला. यात इतर कोणाला याचा त्रास नसल्याचे दिसून आले आहे. या दाम्‍पत्याला कोविडचा नवा प्रकाराची लागण झाली आहे का? हे स्पष्ट झालेले नाही. त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल थोड्या दिवसांनी मिळेल. त्यानंतर हा कोणत्या प्रकारचा कोरोना आहे हे स्पष्ट होणार आहे.

घाबरू नका, काळजी घ्या

महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोना नियमांचे पालन करावे आणि सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Results : सतेज पाटलांच्या विजयामुळे धास्ती? 'गोकुळ'च्या निकालाने महायुती बॅकफूटवर? कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता

TV पाहण्याची पद्धत बदलणार! सेट-टॉप बॉक्सशिवाय ५०० हून अधिक चॅनेल्स, प्लॅन फक्त १९९ रुपयांपासून, टाटा प्लेची भन्नाट ऑफर

अभिनेता धनुष राजकारणात येणार? कोणत्या पक्षात जाणार, संपत्तीची रंगली चर्चा?

Latest Marathi News Live Update : कथित ऑडिओ क्लिपवर भाजप -शिवसेना आमनेसामने; उदय सामंत काय म्हणाले?, पदवीधरवरही भाष्य

Farmer Relief: पाच हजारांची मदत नको, शेतकऱ्यांना भरीव दिलासा हवा!

SCROLL FOR NEXT