The 102-Year-Old Saubai Overcame Corona Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

...अन्‌ 102 वर्षीय साऊबाई कोरोनावर मात करुन चालत परतल्या घरी

सागर कुंभार

रुकडी : माणगाव (ता. हातकणंगले) येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये उपचार घेणाऱ्या 102 वर्षीय साऊबाई शिवगोंडा पाटील या आजीबाईंनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात करून घरी परतल्या आहेत. 

निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील शेतकरी कुटुंबातील साऊबाई शिवगोंडा पाटील या मुलगा, सून, नातू व नातसूनेसह राहतात. मुलगा राजगोंडा हे तेथील एका हायस्कूलमध्ये मदतनीस म्हणून काम करतात. पतीच्या मृत्यूनंतर 35 वर्षापासून आजीबाई सून सुवर्णासह शेती करतात.

वयाची शंभरी ओलांडलेल्या साऊबाई आजही शेतातील कामे करतात. त्यांचा कोरोना अहवाल 1 सप्टेंबरला पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन जणांचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने त्यांना हातकणंगले तालुक्‍यातील अतिग्रे येथील कोरोना उपचार केंद्रात दाखल केले होते.

5 सप्टेंबरला त्यांना माणगाव येथील ग्रामपंचायत व वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्टने चालवलेल्या केंद्रामध्ये दाखल केले. त्यांच्यावर माणगाव येथील खासगी डॉक्‍टरांच्या पथकाने उपचार केले. कोरोनाला हरवून आज त्या घरी परतल्या. माणगाव केंद्रातर्फे त्यांचा सत्कार केला. वाहनापर्यंत कुणाचाही आधार न घेता चालत गेल्या. विनायक शिरुटे, राहुल पाटील, अमोल मगदूम, अभिजित घोरपडे, शिरीष मधाळे, भाऊसाहेब हेरवाडे, सागर चव्हाण, अभय चौगुले आदी उपस्थित होते. 

अशीही जगण्याची प्रेरणा 
कोरोना झाल्यावर वेळीच योग्य औषधोपचार व जगण्याची सकारात्मक दृष्टी ठेवल्यास कोरोनासारख्या रोगावरही मात करता येते. कोरोना रुग्णांनी कोणतीही भिती न बाळगता आत्मविश्वासाने सामोरे जाणे किती महत्त्वाचे आहे. हे या 102 वर्षीय साऊबाई पाटील यांनी सर्वांसाठी दाखवून देवून रुग्णांना जगण्याची नवी प्रेरणा दिली आहे. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 4th T20I : भरवशाच्या म्हशीला टोणगा! भारताच्या फलंदाजांनी माती खाल्ली, श्रेयस अय्यरच्या खेळीने लाज वाचवली

Ashadhi Wari : आनंदोत्साहात पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये

IND vs ENG 4th T20I : पुन्हा तेच... वैभव सूर्यवंशी IPL समजून खेळायला गेला अन् जोफ्रा आर्चरने पुन्हा कार्यक्रम केला... Video

Sakal Impact : ई-सकाळच्या बातमीचा परिणाम; वेळ नदीवरील खचलेला पूल रातोरात दुरुस्त, वाहतूक पुन्हा सुरळीत

राज्यातील लाखो झोपडपट्टीवासीयांना दिलासा! २०११ पूर्वीच्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता; महायुती सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT