Ichalkaranji Crime News esakal
कोल्हापूर

Ichalkaranji Crime : दहावी परीक्षा अभ्यासाच्या ताणातून वाढदिनीच विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल..

वाढदिवसादिवशीच (Birthday) त्याने जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

इचलकरंजी : दहावीची पूर्वपरीक्षा झाली आणि एक महिन्यावर आलेल्या मुख्य परीक्षेची (10th Exam) तयारी करत असताना अभ्यासाचा ताण घेतला. हा ताण नैराश्येपर्यंत पोहोचला. या विद्यार्थ्यांने (Student) काल (गुरुवार) सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास थेट राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस शेखर वसकोर्ट (वय १६, रा. तोरणानगर, शहापूर) असे त्याचे नाव आहे.

वाढदिवसादिवशीच (Birthday) त्याने जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तेजस तोरणानगर भागातील सर्वसामान्य कुटुंबात राहत होता. आई-वडील, बहीण असे त्यांचे कुटुंब. वडील यंत्रमाग कामगार तर आई मोलमजुरीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तेजस कुटुंबातील लहान सदस्य म्हणून त्याचे उत्तम संगोपन करून चांगले शिक्षण देण्यासाठी आई-वडिलांची धडपड होती. तो येथील एका माध्यमिक विद्यालयात शिकत होता.

काही दिवसांपूर्वी दहावीची पूर्वपरीक्षा त्याने सुरळीत दिली. आज सकाळी त्याने अभ्यास पूर्ण होत नसल्यामुळे व अभ्यासाचा ताण असल्याचे सांगत घरी रडत होता. बहिणीने त्याला समजावून सांगितले. दरम्यान, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तेजसने आत्महत्याच केल्याचे समोर आले.

घरातील हॉलमध्ये छतास असलेल्या लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार घटनेची शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. रुग्णालयात आई, वडील बहिणीसह नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला.

अन् आत्महत्येचा विचार...

रडत बसलेल्या तेजसला बहिणीने समजावून सांगत रेशन दुकानात जाऊन आल्यानंतर अभ्यास करूया असे सांगितले. त्यानंतर बहीण निघून गेली. यंत्रमागावरून रात्रपाळी करून वडील आल्याने तेही झोपी गेले होते. यावेळी एकांतात असलेल्या तेजसने आत्महत्येचा विचार करत जीवन संपवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह शंभर दिवसांमध्येच आले अडचणीत; सरकारविरोधात संघर्ष पेटला

IND vs ZIM 1st T20I: मयांक यादवने इतिहास रचला, पण कौतुक इशान किशनचे झाले! पहिल्याच चेंडूवर असे काय घडले? Video Viral

Ajit Pawar Statue: बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भावपूर्ण लोकार्पण; तिरंगा सर्कलजवळ स्मृतीस्थळाला मान्यवरांची उपस्थिती

Latest Marathi Update : काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर भाजपचं आंदोलन फसलं

Delhi Lathi Charge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मोहोळमध्ये तीव्र निषेध; विविध पक्ष, संघटना व वकील संघटनेची भव्य रॅली

SCROLL FOR NEXT