215 study branches to be examined; Examination of shivaji university administration in planning 
कोल्हापूर

215 अभ्यास शाखांची होणार परीक्षा ;  नियोजनात विद्यापीठ प्रशासनाचीही परीक्षा 

संदीप खांडेकर

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील विविध विद्याशाखांच्या अंतिम वर्षातील  75 हजार विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे 680 अभ्यास शाखांपैकी 215 अभ्यास शाखांची परीक्षा होणार आहे. त्याच्या नियोजनाच्या दृष्टीने विद्यापीठ प्रशासनालाही कठोर परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. कोरोना रुग्णांसाठी दिलेली वसतिगृहे विद्यार्थ्यांसाठी पुन्हा उपलब्ध करण्यासाठी धावपळ करावी लागेल. 
सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षातील परीक्षा घेण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे विद्यापीठात अस्वस्थतेचे चित्र आहे. नियमित मनुष्यबळाची कमतरता असल्याचा तो परिणाम आहे. त्यातही कोरोनाच्या काळात परीक्षा विभागातील एकूण 70 पैकी सुमारे 20 कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक, सुपरिटेंडंट, असिस्टंट रजिस्ट्रार यांना कोरोनाची बाधा झाली होती. यातील असिस्टंट रजिस्टर यांचा मृत्यू झाला आहे, परीक्षा विभागातील काही कर्मचारी क्वारंटाईन आहेत. 
शासनाच्या पुढील निर्देशानुसार परीक्षांचे वेळापत्रक ठरवले जाईल. त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. विद्यापीठातील सध्याची स्थिती पाहता कमी मनुष्यबळावर परीक्षा विभागाचा डोलारा उभा आहे. आर्थिक वर्षाची परीक्षा घेतली जाणार असल्याने वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परतावे लागणार आहे. त्यांची सोय वसतिगृहात करायची झाल्यास इथला क्वारंटाईन कक्ष हलवावा लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला जिल्हा प्रशासनाशी तत्परतेने हा विषय निकालात काढावा लागणार आहे. 
याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे म्हणाले, "शासनाच्या निर्देशानुसार परीक्षांचे नियोजन करावे लागेल. त्याची तयारी आम्ही करणार आहोत. परीक्षा संदर्भात आज कुलगुरूंची बैठक 

अभ्यास शाखानिहाय परीक्षार्थी असे : 
*बी. ए., बी. कॉम, बी. एस्सी. - प्रत्येकी 15 हजार 
*एम. ए. - 1800 
*एम. एस्सी. - 2500 
*एम. कॉम.- 5000 
*बी. बी. ए.- 1200 
*बी. सी. ए. - 1800 
*एम. सी. ए. - 200 
*एम. बी. ए. - 1000 
*इंजिनिअरिंग - 9000 
*उर्वरित इतर पदविका व प्रमाणपत्र शाखा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiroli Toll Naka Accident : शिरोली टोलनाक्याजवळ भीषण अपघात, पुलावरून मोटार कोसळून एक ठार; ३० फुटांवरून मोटार पडली अन्...

दिल्लीनंतर बिहारमध्ये अग्नितांडव, आग लागताच ICUमध्ये रुग्णांना सोडून पळाले कर्मचारी; तिघांचा मृत्यू, २० जण जखमी

IAI Exam Paper leak: ‘नीट’नंतर आणखी एक पेपरफुटी! ‘आयएआय’ परीक्षेची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर व्हायरल, दिल्लीतील क्लासचालकाविरुद्ध गुन्हा

Latest Marathi News Live Update : नागपूर महानगर पालिका लोकसहभागातून 5 लाख वृक्षारोपणाची मोहीम राबविणार

लाभ बंद झालेल्या बहिणींची शक्कल! ज्येष्ठ लाडक्या बहिणींची ‘श्रावणबाळ’कडे तर कुटुंबातील तिसऱ्या बहिणींचेही निराधार योजनेसाठी अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT