Action against Sarpanch in case of corona of senior citizens deprived of vaccination: Collector Desai 
कोल्हापूर

लसीकणापासून वंचीत ज्येष्ठांना कोरोना झाल्यास सरपंचावर कारवाई ः जिल्हाधिकारी देसाई

डी.आर. पाटील सरूड

सरुड, ः को-व्हॅक्‍सिन लसीकरणापासून वंचित राहिलेली व्याधीग्रस्त तसेच ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्ग झाल्यास स्थानिक सरपंच व पदाधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करणार असा इशारा कोल्हापूरचे  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. 
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने तिसऱ्या टप्प्यातील प्रशासकीय नियोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी देसाई बुधवारी शाहूवाडी तालुक्‍याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी कोविड 19 नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या कामात तालुक्‍यातील आरोग्य विभाग गोंधळल्याची टिप्पणी करून गटविकास अधिकाऱ्यांनी याकामी लक्ष घालण्याची सूचना केली. 
दरम्यान लसीकरणात शाहूवाडी तालुका मागे पडल्याचे निदर्शनास आणून देत शाहूवाडी प्रशासनाच्या उदासीन भूमिकेवर जिल्हाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली व जिल्हाधिकाऱ्यांनी कडक शब्दात नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नियोजन आराखड्यासंबंधी सूचनांची अंमलबजावणी झाली नसल्याने स्थानिक प्रशासन तोंडघशी पडले. जिल्ह्यात सर्वात अगोदर शाहूवाडीत कोविड संसर्ग उद्भवून त्याचा प्रसारही झपाट्याने झाल्याची आठवण करून देत, असा हलगर्जीपणा यापुढे खपवूनही घेणार नाही, अशा शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. जिल्हाधिकारी देसाई यांनी सरुड, बांबवडे, भेडसगाव, माण आरोग्य केंद्रांना भेट दिली. 
यावेळी तहसीलदार गुरु बिराजदार, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, विजय बोरगे, बीडीओ अनिल वाघमारे, डॉ. एच. आर. निरंकारी, डॉ. दीपाली पाटील आदी उपस्थित होते.

संपादन यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT