कोल्हापूर

‘गोकुळ’ ची कारवाई ; दूध चोरणाऱ्या टेंपो चालकाला केला दंड

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (Gokul Doodh Sangh)(गोकुळ) भोज ते गोकुळ शिरगांव (Bhoj to Gokul Shirgaon) मार्गावरील दूध वाहतूक करणाऱ्या टेंपो चालकाने केलेल्या दूध चोरी प्रकरणी संबंधित मार्गाचे ठेकेदार दिलीप ज्ञानदेव पाटील यांना दहा हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. संबंधित चालकाला काढून टाकण्याची सूचनाही ‘गोकुळ’च्या प्रशासनाने या ठेकेदारांना केली आहे.

पाटील यांच्याकडे भोज मार्गावरील दूध वाहतुकीचा ठेका आहे. ५ ऑगस्टला या मार्गावर टेम्पोचालक महावीर आण्णासो आळते याला भोज गावांत शिवकृषी अभिवृद्धी दूध संस्थेच्या कॅनमधून सात लिटर म्हैस दूध काढून ते दुसऱ्या संस्थेच्या कॅनममध्ये ओतत असताना संस्था प्रतिनिधींनी रंगेहाथ पकडले. या प्रकाराचे संबंधित संस्था प्रतिनिधींनी व्हीडीओ चित्रीकरणही केले. गेले महिनाभर हा प्रकार सुरू असल्याचे या प्रतिनिधींनी सांगितले.

या दूध चोरीची गंभीर दखल घेत ‘गोकुळ’च्या संकलन विभागाने संबंधित मार्गाचे ठेकेदार पाटील यांना दहा हजार रुपये दंडाची कारवाई केली. या दंडाची वसुली त्यांच्या वाहतूक बिलातून करण्यात येणार आहे. याशिवाय महिनाभर जेवढे दूध चोरले त्याचीही रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे.

‘सकाळ’ने फोडली वाचा

या दूध चोरीच्या प्रकाराची ‘सकाळ’ वाचा फोडली. ‘सकाळ’च्या ७ ऑगस्टच्या अंकात या संदर्भातील सविस्तर वृत्त दिल्यानंतर संघाने या मार्गावरील वाहतूक ठेकेदारावर तातडीने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT