Appeal of Vice Chancellor of Shivaji University 
कोल्हापूर

कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी एक दिवसाचे वेतन द्या : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुंचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, मान्यता प्राप्त संस्थाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचारी,  अधिविभागांंचे विभाग प्रमुख, संचालक, समन्वयक, शिक्षक, सर्व प्रशासकीय अधिकारी, सेवक यांनी ‘कोरोना’ (कोव्हीड-१९) विरुद्धच्या लढाईसाठी एक दिवसाचे वेतन मदतीच्या स्वरुपात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ देवानंद शिंदे यांनी आज केले. त्याबाबतचे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

डॉ. शिंदे म्हणाले, "आपला देश आणि राज्य सध्या कोव्हीड-१९ कोरोना व्हायरसच्या अत्यंत गंभीर अशा संकटातून जात आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन कोरोना व्हायरसचा (कोव्हीड-१९) प्रकोप रोखण्याकरिता कठोर प्रयत्न करत आहेत. या कठीण प्रसंगी देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की, आपण आपल्या देशासाठी मोलाचे योगदान दिले पाहिजे. याच भावनेतून आपण सर्वांनी मिळून आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता देण्यात यावे." विद्यापीठाने विद्यापीठात शिव आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करून वेगळ्या आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशिक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुुसार  एक दिवसाचे वेतन देण्याबाबतही आवाहन केले आहे. तरी विद्यापीठाशी सर्व सबंधित घटकांनी एक दिवसाचे वेतन मदतीच्या स्वरुपात मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: Google Mapsचा घात! लग्नाला निघालेले तरुण थेट नाल्यात; कार हवेत लटकली

India vs New Zealand T20 World Cup Final: टी-२० विश्वकरंडकाची अंतिम लढत; सूर्यकुमारच्या संघासमोर न्यूझीलंडचे आव्हान

Pune Crime News : पुण्यात महिला दिनीच धक्कादायक प्रकार, “तू खूप सुंदर दिसतेस” म्हणत डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; आरोपी सीसीटीव्हीत कैद

Latest Marathi News Live Update : राष्ट्रपतींवर टीकेबद्दल मोदींकडून ममता लक्ष्य

IND vs NZ Final Live Telecast: आज ठरणार विश्वविजेता! सामना किती वाजता आणि फ्री लाईव्ह कुठे पाहायचा? वाचा पूर्ण डिटेल्स

SCROLL FOR NEXT