Challenge Before Ichalkaranji Municipality To Remove Hydrofoil Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

जलपर्णी हटविण्याचे इचलकरंजी पालिकेसमोर आव्हान

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : पंचगंगा नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या मोहिमेला गती आली. पण, तितक्‍याच गतीने जलपर्णी वाढत असल्याने जलपर्णी हटविण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. दरम्यान, आरोग्य सभापती संजय केंगार यांनी पंचगंगा नदीघाटावर जाऊन या मोहिमेची पाहणी करून माहिती घेतली. त्यांनी तातडीने आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी संपर्क साधला. पंचगंगा नदी तातडीने प्रवाहित करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. 

येथील पंचगंगा नदीपात्र जलपर्णीने व्यापले असून, दोन दिवसांपासून जलपर्णी काढण्याची मोहीम सुरू आहे. अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखालील पैलवानांची एक टीम कार्यरत आहे. पालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारीही सकाळच्या सत्रात या मोहिमेत सहभागी झाले आहेत. आज बोटीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात घाट परिसरातील जलपर्णी हटविण्यात आली. मात्र, तितक्‍याच वेगाने जलपर्णी वाढत असल्याने संपूर्ण जलपर्णी काढण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. 

दरम्यान, आरोग्य सभापती केंगार यांनी नदीघाट परिसरात जाऊन जलपर्णी काढण्याच्या मोहिमेची माहिती घेतली. नदी प्रवाहित केल्याशिवाय जलपर्णीचा प्रश्‍न मार्गी लागणार नाही. त्यामुळे त्यांनी आमदार आवाडे यांच्याशी संपर्क साधला. पंचगंगा नदी प्रवाहित करण्याबाबत त्यांच्याकडे श्री. केंगार यांनी विनंती केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आवाडे यांनी सांगितले. या वेळी स्वच्छता निरीक्षक विजय पाटील, बबन कांबळे उपस्थित होते. 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Ramdev Kangana Ranaut : बाबा रामदेव यांचा कंगना रणौतवर पलटवार; म्हणाले, ‘अशा लोकांबद्दल टिप्पणी करायची नाही’

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

Sugar Rate : दिवाळीपर्यंत साखर शंभरी पार जाण्याची भीती; राज्यात १८ लाख टन साठा शिल्लक

Marathi News Live Updates : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य सचिवांच्या नेतृत्वात समिती नेमणार : आरोग्यमंत्री आबिटकर

माझी इच्छा नव्हती सुनीधीकडून गाऊन घ्यायची... अवधूत गुप्तेने सांगितली 'कांदे पोहे' गाण्याची कथा; मराठी अभिनेत्रीने आधीच गायलेलं गाणं

SCROLL FOR NEXT