chandrakant patil criticized on state government in kolhapur 
कोल्हापूर

'खाईल त्याला खवखवे म्हण राज्य सरकारला लागू होते'

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी सापडली. या गुन्ह्यात सचिन वाझे यांना अटक झाली आहे. याच कारणावरून आज मुंबई पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांचीही बदली झाली. मात्र, ही केवळ प्यादी आहेत. तपास यंत्रणा लवकरच याच्या मुळाशी पोचतील. त्यानंतर जे चित्र समोर येईल, त्यामुळे सरकारचा बुरखा फाटेल, असे भाकित भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

ते म्हणाले, सरकार कोणत्याही प्रश्‍नामध्ये तोंडावरच पडते. पूजा चव्हाण प्रकरणात मंत्री राठोड यांचा राजीनामा घेण्यास तयार नव्हते. मात्र नंतर त्यांना राजीनामा घ्यावा लागला. सचिन वाझे याचे निलंबन करणार नाही अशी भूमिका सरकारने घेतली. त्याचेही निलंबन करावे लागले. आता मुंबई पोलिस आयुक्तांचीही बदली करावी लागली आहे. बदली झाली कदाचीत कारवाई पण होईल.

तपास यंत्रणा या प्रकणाच्या मुळाशी पोहचतील. वाझे, मुंबई पोलिस आयुक्त हे केवळ प्यादी आहेत. याच्यामागची राजकीय शक्ती कोण आहे ते लवकरच पुढे येईल. मग या सरकारचा बुरखा फाटेल. या प्रकरणामध्ये पोलिस यंत्रणेचा सहभाग उघड झाला आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा.’’

राऊतांना गृहमंत्री करा

खासदार संजय राऊत मंत्रिमंडळात नाहीत. ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. तरीही सरकारच्या प्रत्येक गोष्टीवर ते बोलतात. वाझे हा कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचे म्हणतात. त्यामुळे आता त्यांनाच गृहमंत्री करा.
 

सरकार कसे पडेल? 

विरोधी पक्षातील कोणीही असे म्हणत नाही, की वाझे प्रकरणावरून सरकार पडेल; पण मग शरद पवार आणि राज्यातील मंत्री वारंवार सरकारला धोका नाही, असा खुलासा का करीत आहेत? खाईल त्याला खवखवे ही म्हण या सरकारला लागू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT