Chandrakant Patil Esakal
कोल्हापूर

राजकीय आरोप-प्रत्यारोपानंतर चंद्रकांत पाटील विठ्ठल नामात दंग

चंद्रकांत पाटील यांनी विठूरायाचा नामाचा जयघोष केला.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडला आहे. ही निवडणूक महाविकास आघाडीबरोबर भाजपसाठी देखील प्रतिष्ठेची बनली आहे. सत्ताधारी-विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा उमेदवार सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर आघाडीकडून जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी कंबर कसली आहे. दरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोपानंतर मात्र चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) विठ्ठल नामात दंग झाले आहेत.

दरम्यान,गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील तळेमाऊली मंदिर परिसरात पाडवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. काल या कार्यक्रमात वारकरी बांधव टाळ मृदंगाच्या तालावर विठूरायाच्या नामस्मरणात तल्लीन झाले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनीही सहभागी होऊन, विठूरायाचा नामाचा जयघोष केला.

राजकीय आरोप प्रत्यारोपानंतर मात्र चंद्रकांत पाटील विठ्ठल नामात दंग झाले आहेत.

आज सकाळी चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर मधील रंकाळा टॉवर येथील जावळाचा गणपती येथील सामाजिक कार्यकर्ते हेमंत कांदेकर यांची सदिच्छा भेट घेतली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवारालाच मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान येथे शहर भाजपाच्या वतीने मिसळ पे चर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थिती त्यांनी लावली.‌

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT