Chemical fertilizer prices skyrocket; An increase of Rs 45 per grandchild 
कोल्हापूर

रासायनिक खताचे दर गगनाला ; पोत्याला तब्बल 45 रुपये वाढ

कुंडलिक पाटील

कोल्हापूर : हंगामाच्या तोंडावर रासायनिक खताचे दर गगनाला भिडले आहेत. एका कंपनीने रासायनिक खताचा दर पोत्याला तब्बल 45 रुपये वाढविला आहे. आतापर्यंत दोन कंपन्यांनी खताचे दर वाढविले आहेत. यामुळे कोरोना काळात आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्याचे खत दरवाढीमुळे कंबरडे मोडणार आहे. 
जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या 86 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. या हंगामासाठी 91 हजार 114 मेट्रीक टन खताचा पुरवठा झाला होता. सध्या लागणीचा हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांकडून खताची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही कारखान्यांनी उसाची बिले अद्याप दिलेली नाहीत. 
अशावेळी महिन्यापासून दोन कंपन्यांनी दोन वेगवेगळ्या खताचे दर वाढविले आहेत. एका कंपनीने 10:26:26 खताचा दर 1235 रुपये होता, तो 35 रुपयेने वाढवून 1330 रुपये केला आहे. या कंपनीने 12:32:16 या खताचा जुना दर 1305 रुपये होता, तो दर 45 रुपये वाढवून 1350 रुपये केला आहे. कृषी अधिकाऱ्याकडून कंपनीशी संपर्क साधला असता नोव्हेंबरपासून दर वाढविल्याचे सांगितले. दुसऱ्या एका खतदर वाढवलेल्या कंपनीशी संपर्क साधला असता 10 : 26:26 खताचा दर 1175 जुना दर होता. त्यात 25 रुपये वाढवून 1200 दर झाल्याचे सांगितले. ऑरगॅनिक कोटिंग मुळे दर वाढल्याचे कंपनीने सांगितले आहे. 
एका कंपनीचा पोटॅश (एमओपी) खताचा जुना दर 901 होता हा दर 26 रुपयेने कमी होऊन 875 रुपये झाला आहे. 


शेतकऱ्यांनी खताचे दर पाहून खत खरेदी करावे.जुन्या दराचे खत वाढीव दराने विकल्यास शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. 
-चंद्रकांत सूर्यवंशी , जि. प. कृषी विकास अधिकारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT