Conservation of indigenous seeds is required 
कोल्हापूर

बिवाळ्यातून हवे देशी बियाणांचे संवर्धन 

अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : : मे महिना संपत जाईल, तसे जमीन तयार झाली की, बी-बियाणांची चाचपणी सुरु होते. बियाणे नेमकं कुठे ठेवले आहे? 
ते सुरक्षित आहे का? ते किडलेले तर नाही ना, हे पाहिले जाते. अमुक एक बियाणे नसेल तर दुसऱ्याकडून ते बियाणे घ्यायचे. त्याबदली आपल्याकडील बियाणे दुसऱ्यांना द्यायचे हा ग्रामीण ट्रेंड अजूनही सुरु आहे; मात्र बि-बियाणे साठवण्याची पद्धती (बिवाळा) आता कालबाह्य झाली आहे. एकतर बियाणे बाजारातून विकत आणली जातात. पूर्वी घरात, खोपीत बियाणे जपून ठेवण्याची परंपरा लोप पावत चालली आहे.

बिवाळ्यामुळे अनेक बीज संवर्धित होतात. विविध कंपन्यांनी आपली बियाणे, वाण विकसित केले आहे. ही विकसित बियाणे शेतकरी आज शेतात, परसदारात वाढवितात. यामुळे मुळ बियाणे लोप पावून या बियाणांची डीएनए रचना पुढील पिढीत संक्रमित होत नाही. कितीतरी पारंपरिक बियाणे लोप पावून ती जागा नवीन बियाणांनी घेतली आहे. काही ठिकाणी मूळ बियाणे संवर्धित ठेवण्याकडे कल दिसतो. जसे की, टोपलं, बुट्टी, तट्ट्या, मातीचा डेरा आदीमध्ये बियाणे ठेवले जाते. तत्पूर्वी, बियाणे राखेत मिसळली जातात. रसायने, पावडर वापरली जात नाही. बिवाळ्यात कसर किंवा किड लागत नाही. पेरणीवेळी ते बियाणे पेरले जाते. ग्रामीण भागात "बिवाळा' हा शब्द आजही ऐकयला मिळतो. बिवाळ्यात भात, नाचणा, गहू, मिरची, भोपळा, कारले, सावा, वरणा बीज सुरक्षित राहते. 

काही कंपन्यांची बियाणे मिळतात; पण ती अनेकदा बोगस निघतात. म्हणजे ते पेरले तरी उगवत नाही. यासाठी शेतकरी गावात ज्यांच्याकडे मुळ बियाणे आहेत, ती घेतात. त्याबदली आपल्याकडील बियाणे देतात. हा बिवाळा वेळू, नारळाचा काथ्या, वाळवलेला भोपळा, कागदाचा लगदा, रांजन, माठामध्ये ठेवला जातो. यासाठी बियाणे वाळवले जाते. जिथे पाणी पडणार नाही, आर्द्रता शोषली जाणार नाही, अशा सुरक्षित ठिकाणी बियाणे ठेवतात. काही शेतकरी बिवाळ्यांचे संवर्धन करतात. बियाणांबरोबर मसाल्यातील बीजे, काजू, आंब्याची बाठ, फळांच्या बियाही टिकवून ठेवल्या जातात. यातून मूळ बीज सुरक्षित राहते. 


हा ठेवा जपला पाहिजे 
जेव्हा बाजारात शेतीतील बीज मिळत नाही तेव्हा हा "बिवाळा' अनेकांना उपयोगात येतो. गावातील एकमेकांना बियाणे देण्याचा हा ट्रेंड शेती, पिके टिकून ठेवेल. बिवाळा म्हणजे, एकार्थाने बीज बॅंकच आहे. या बॅंकेत दरवर्षी बियाणे ठेवली पाहिजे, ही अट असते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT