contractor fraud form farmer crime news marathi 
कोल्हापूर

ऊस तोडणीसाठी सात कोयते पुरवितो म्हणत शेतकऱ्याला घातला चार लाखांचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा

चंदगड (कोल्हापूर) :  ऊस तोडणीसाठी सात कोयते पुरवितो असे सांगून सदारवाडी (ता. चंदगड) येथील परशराम नारायण सदावर यांची 3 लाख 98 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चंदगड पोलिसांत पोपट दैवत घाडगे (ढाकेफळ, ता. केज जि. बीड) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

2019-20च्या हंगामासाठी परशराम सदावर यांच्या ट्रॅक्‍टरवर सात कोयते पुरवितो म्हणून घाडगे यांनी सदावर यांच्याकडून 4 लाख 10 हजार रुपये धनादेशाद्वारे घेतले होते. घाडगे यांनी पैसे घेतले मात्र मजूर पाठविले नाहीत. सदावर यांनी त्यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली; पण पैसे मिळाले नाहीत. मात्र 2020-21 च्या हंगामात कोयते पाठविण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर सदावर यांनी पुन्हा घाडगेना 1 लाख रुपये दिले. 

घाडगेंना एकूण 5 लाख 10 हजार रुपये पोहचल्याचा सदावर यांनी लेखी करारपत्र केले. तोडणी हंगाम सुरू झाल्यानंतर सदावर टोळी आणण्यासाठी घाडगे यांच्याकडे गेले. त्या वेळी पुन्हा सदावर यांनी त्यांना 80 हजार रोख दिले. करारपत्रात ठरल्याप्रमाणे घाडगे यांनी सात कोयते न देता चार कोयते दिले. या चार कोयत्यांनी केवळ दोन महिने काम केले. हंगाम अर्धवट असताना व दिलेली पूर्ण रक्कम परतफेड करण्यापूर्वीच घाडगे व त्यांचे तोडणी मजूर पळून गेल्याने सदावर यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत केली आहे.  

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT